सातारा : सहाशे फूट खोल दरीत कोसळला टेम्पो, पसरणी घाटात अपघात : एक ठार; दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 03:47 PM2018-04-05T15:47:52+5:302018-04-05T15:47:52+5:30
वाई-पाचगणीदरम्यान असलेल्या पसरणी घाटात गुरुवारी पहाटे चित्रपट निर्मितीचे साहित्य घेऊन निघालेला टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल सहाशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात क्लिन्नर जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पप्पू जसवाल (वय ३८, अलहाबाद) असे ठार झालेल्या क्लिन्नरचे नाव आहे.
वाई : वाई-पाचगणीदरम्यान असलेल्या पसरणी घाटात गुरुवारी पहाटे चित्रपट निर्मितीचे साहित्य घेऊन निघालेला टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल सहाशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात क्लिन्नर जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पप्पू जसवाल (वय ३८, अलहाबाद) असे ठार झालेल्या क्लिन्नरचे नाव आहे.
याबाबत वाई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास टेम्पो (एमएच ०४ एचडी ४६९०) चित्रपट निर्मितीचे साहित्य घेऊन पसरणी घाटातून पाचगणीकडे निघाला होता.
घाटातील बुवासाहेब मंदिराजवळील वळणावर आल्यानंतर चालक रमेश मोतीलाल जसवाल (५८, अलहाबाद, उत्तरप्रदेश) याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. यानंतर टेम्पो घाटातीलसंरक्षक कठडा तोडून तब्बल सहाशे फूट खोल दरीत कोसळला.
त्यानंतर मोठा आवाजझाला. इतर वाहनचालकांनी तत्काळ आपली वाहने थांबवून दरीत उतरण्यास सुरुवात
केली. जखमींना दरीतून वर काढण्यात आले. या अपघातात क्लिन्नर पप्पू जसवाल हा गंभीर दुखापत झाल्याने जागीच ठार झाला, तर चालक रमेश जसवाल व पट्टेबहादूर अमृतलाल दिंड दोघे गंभीर जखमी झाले.
जखमींवर वाई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त टेम्पो दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून, घाटातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.