सातारा : धरणक्षेत्रात पावसाचा जोर नाही, आवक दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:30 PM2018-06-12T13:30:59+5:302018-06-12T13:30:59+5:30
सातारा जिल्ह्यात मान्सूनने वेळेवर हजेरी लावली असलीतरी धरण क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर नाही. त्यामुळे धरणात आवक सुरू झालेली नाही. तर कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत अवघा २४ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.
सातारा : जिल्ह्यात मान्सूनने वेळेवर हजेरी लावली असलीतरी धरण क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर नाही. त्यामुळे धरणात आवक सुरू झालेली नाही. तर कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत अवघा २४ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.
जिल्ह्यात ८ जूनच्या दरम्यान मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दुष्काळी भागासह पश्चिम भागात चांगला पाऊस झाला. महाबळेश्वर येथेही पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील धरण, तलावातील पाणीसाठ्यात वाढ होईल, अशी शक्यता वाटत होती; पण गेल्या तीन दिवसांपासून पूर्व भागात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे.
तर पश्चिम भागात कोयना, मोरणा धरण परिसर वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणात अद्यापही पाण्याची आवक झालेली नाही. महाबळेश्वरमध्येही मंगळवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली होती.
मंगळवारी सकाळपर्यंत २४ तासांतील पाऊस
कोयना : २४ मिलिमीटर
कण्हेर : ००
धोम : ००
उरमोडी : ००
तारळी : ०६
मोरणा : १८
उरमोडी : ००
धोम बलकवडी : ००