सातारा : खटाव तालुक्यातील तीनशे कुटुंबं स्वस्त धान्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 02:13 PM2018-05-22T14:13:09+5:302018-05-22T14:14:04+5:30
कार्डधारकांसाठी शासनाने सुरू केलेल्या नवीन नियमानुसार बारा अंकी फिडिंग नंबर नसलेल्या दोनशे ते तीनशे कार्डधारक कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्या कुटुंबांचे हाल होत असून, कार्डधारक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
खटाव : कार्डधारकांसाठी शासनाने सुरू केलेल्या नवीन नियमानुसार बारा अंकी फिडिंग नंबर नसलेल्या दोनशे ते तीनशे कार्डधारक कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्या कुटुंबांचे हाल होत असून, कार्डधारक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
शासन नियमानुसार ज्या रेशनकार्ड धारकांच्या कार्डवर त्यांनी निर्धारित केलेला बारा अंकी फिडिंग कोड नंबर नसेल तर धान्य न देण्याच्या परिपत्रकामुळे असे ग्राहक महिन्याला मिळणाऱ्या धान्यापासून वंचित झाले आहेत.
बऱ्याच कार्ड धारकांनी वेळेत आधार कार्ड तसेच लागणारी अन्य कागदपत्रे देऊनही आधार कार्ड फिडिंग न झाल्याने त्यांना धान्य मिळत नाही. यामुळे या कार्डधारकांमधून नाराजीचा सूर उमटायला लागला आहे.
हे कार्डधारक आजही स्वस्त धान्य दुकानात जाऊन संबंधित दुकानदाराकडे विचारपूस करत आहेत. त्याचबरोबर प्रसंगी दुकानदारांशी हुज्जतही घालताना दिसून येत आहेत. या वंचित कार्डधारकांना वेळेत धान्य पुरवठा करावा, अशीही मागणी होत आहे.