साताऱ्यात आतापर्यंतचे निच्चांकी तापमान १२ पर्यंत... थंडीत चढ-उतार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:35 PM2017-12-18T13:35:03+5:302017-12-18T13:38:35+5:30

नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले असून, दिवसेंदिवस चढ-उतार होत आहे. साताऱ्याचे शनिवारी किमान तापमान १४.०९ तर रविवारी सकाळी १६ अंशावर होते.

In Satara, till now the minimum temperature is up to 12 ... | साताऱ्यात आतापर्यंतचे निच्चांकी तापमान १२ पर्यंत... थंडीत चढ-उतार सुरू

साताऱ्यात आतापर्यंतचे निच्चांकी तापमान १२ पर्यंत... थंडीत चढ-उतार सुरू

Next
ठळक मुद्देनोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यात थंडीस सुरुवातसाताऱ्यात शनिवारी १४.९ तर रविवारी किमान तापमान १६ अंशावर थंडीमुळे मोठ्या शहरातील बाजारपेठेवरही परिणाम

सातारा : नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले असून, दिवसेंदिवस चढ-उतार होत आहे. साताऱ्याचे शनिवारी किमान तापमान १४.०९ तर रविवारी सकाळी १६ अंशावर होते.

नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यात थंडीस सुरुवात झाली आहे. मात्र, प्रारंभी थंडीचे प्रमाण कमी होते. तर पहाटेच्या सुमारास थंडीची तीव्रता वाढत होती. तरीही जिल्ह्यातील किमान तापमान १९ ते २० अंशाच्या दरम्यान होते. असे असताना डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून मात्र, थंडीच्या तीव्रतेत मोठी वाढ झाली आहे.
 

हळूहळू किमान तापमान खाली येऊ लागले आहे. त्यातच थंड वाऱ्याची झुळुक वाहू लागली आहे. परिणामी सायंकाळपासूनच गारठ्यात वाढ होत आहे. रात्री नऊनंतर तर ऊबदार कपडे घालून बाहेर पडण्याशिवाय पर्याय राहत नाही. या थंडीमुळे मोठ्या शहरातील बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे.

सातारा शहरातील किमान तापमान यावर्षी आतापर्यंत १२ अंशापर्यंत खाली आले आहे. त्यातच किमान तापमानात चढ-उतार होत आहे. १२ ते १८ अंशाच्या दरम्यान किमान तापमान राहत आहे.
 

शनिवारी किमान तापमान १४.०९ होते तर रविवारी तापमानात वाढ होऊन ते १६ अंशावर गेले. ग्रामीण भागातही थंडीची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. पहाटेपासूनच शेकोट्या पेटवण्यात येत आहेत.

 


आतापर्यंतचे निच्चांकी तापमान १२ पर्यंत...
थंडीत चढ-उतार सुरू : साताºयात शनिवारी १४.९ तर रविवारी किमान तापमान १६ अंशावर
सातारा : नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले असून, दिवसेंदिवस चढ-उतार होत आहे. साताºयाचे शनिवारी किमान तापमान १४.०९ तर रविवारी सकाळी १६ अंशावर होते.
नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यात थंडीस सुरुवात झाली आहे. मात्र, प्रारंभी थंडीचे प्रमाण कमी होते. तर पहाटेच्या सुमारास थंडीची तीव्रता वाढत होती. तरीही जिल्ह्यातील किमान तापमान १९ ते २० अंशाच्या दरम्यान होते. असे असताना डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून मात्र, थंडीच्या तीव्रतेत मोठी वाढ झाली आहे. हळूहळू किमान तापमान खाली येऊ लागले आहे. त्यातच थंड वाºयाची झुळुक वाहू लागली आहे. परिणामी सायंकाळपासूनच गारठ्यात वाढ होत आहे. रात्री नऊनंतर तर ऊबदार कपडे घालून बाहेर पडण्याशिवाय पर्याय राहत नाही. या थंडीमुळे मोठ्या शहरातील बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे.
सातारा शहरातील किमान तापमान यावर्षी आतापर्यंत १२ अंशापर्यंत खाली आले आहे. त्यातच किमान तापमानात चढ-उतार होत आहे. १२ ते १८ अंशाच्या दरम्यान किमान तापमान राहत आहे. शनिवारी किमान तापमान १४.०९ होते तर रविवारी तापमानात वाढ होऊन ते १६ अंशावर गेले. ग्रामीण भागातही थंडीची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. पहाटेपासूनच शेकोट्या पेटवण्यात येत आहेत.

Web Title: In Satara, till now the minimum temperature is up to 12 ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.