सातारा : नादुरुस्त एसटीमुळे बामणोलीचा प्रवास असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:23 PM2018-10-24T13:23:14+5:302018-10-24T13:24:10+5:30

सातारा तालुक्यातील दुर्गम बामणोली, कास, गोगवे येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातून एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत. बामणोली परिसरातून असंख्य प्रवासी, विद्यार्थी एसटीने साताऱ्याला प्रवास करतात; परंतु या परिसरात नादुरुस्त गाड्या सोडल्या जात असल्याने प्रवाशांचे हाल होतात.

Satara: Traveling to Bamnoli due to bad stays unprotected | सातारा : नादुरुस्त एसटीमुळे बामणोलीचा प्रवास असुरक्षित

सातारा : नादुरुस्त एसटीमुळे बामणोलीचा प्रवास असुरक्षित

googlenewsNext
ठळक मुद्दे नादुरुस्त एसटीमुळे बामणोलीचा प्रवास असुरक्षितनाल्यात गाडी गेल्याने घाबरगुंडी

बामणोली (सातारा) : सातारा तालुक्यातील दुर्गम बामणोली, कास, गोगवे येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातून एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत. बामणोली परिसरातून असंख्य प्रवासी, विद्यार्थी एसटीने साताऱ्याला प्रवास करतात; परंतु या परिसरात नादुरुस्त गाड्या सोडल्या जात असल्याने प्रवाशांचे हाल होतात.

साताऱ्याच्या पश्चिम भागात असलेल्या काम, बामणोलीत जीवनाश्यक सुविधाही नसल्याने तेथील लोकांना साताऱ्यात दररोज यावे लागते. महाविद्यालयीन तरुणांना एसटीशिवाय पर्यायही नाही.

या मार्गावर सध्या अनेक खराब व नादुरुस्त गाड्या सोडल्या जात आहेत. त्या मध्येच घाटात वळणावर बंद पडत आहेत. त्यामुळे गाडी सुरू होई किंवा पर्यायी सोय होईपर्यंत प्रवासी व विद्यार्थ्यांना मध्येच बसून राहावे लागत आहे.

शाळांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी व प्रवासी यांना एसटी म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशा एसटीचा प्रवास धोकादायक वाटू लागला आहे. या मार्गावरील घाट, वेडीवाकडी वळणे याचा विचार करून सातारा आगाराने या मार्गावर चांगल्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.

नाल्यात गाडी गेल्याने घाबरगुंडी

गोगवेहून साताऱ्यला जाणारी एसटी बामणोलीजवळील धोकादायक वळणावर बुधवारी नाल्यात गेली. त्यामुळे एसटीतील विद्यार्थी व प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. सर्वांनी एसटीतून उतरून पायी चालत जाणे पसंत केले.

Web Title: Satara: Traveling to Bamnoli due to bad stays unprotected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.