सातारा : मंगळवार तळे रस्त्यावरील अतिक्रमणे अखेर काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 02:14 PM2018-07-31T14:14:42+5:302018-07-31T14:18:04+5:30
हंगामी व्यावसायिक आणि हातगाड्यांच्या मुक्त वावरामुळे पथ हरवून गेलेल्या राजवाडा मंगळवार तळे रस्त्यावरील अतिक्रमणे अखेर नगरपालिकेने काढली. पालिकेच्या या धडाकेबाज कारवाईचे स्थानिकांनी कौतुक केले. याविषयी लोकमतने वारंवार आवाज उठविला होता. दरम्यान, या परिसरात हातगाडी लावणाऱ्यांवर भविष्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिला आहे.
सातारा : हंगामी व्यावसायिक आणि हातगाड्यांच्या मुक्त वावरामुळे पथ हरवून गेलेल्या राजवाडा मंगळवार तळे रस्त्यावरील अतिक्रमणे अखेर नगरपालिकेने काढली. पालिकेच्या या धडाकेबाज कारवाईचे स्थानिकांनी कौतुक केले. याविषयी लोकमतने वारंवार आवाज उठविला होता.
दरम्यान, या परिसरात हातगाडी लावणाऱ्यांवर भविष्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिला आहे.
सातारा येथील राजवाडा-मंगळवार तळे रस्त्यावर हंगामी व्यावसायिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. नो हॉकर झोन असतानाही येथे राजरोसपणे हातगाडे लावले जात होते.
याविषयी पोलिसांनीही व्यापाऱ्याना सूचना केल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा येथे हातगाड्यांची हजेरी पाहायला मिळाली. व्यापाऱ्यांना वारंवार सांगूनही बदल न झाल्यामुळे पालिकेच्या वतीने २ हातगाडे जप्त करण्यात आले. या कारवाईच्यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती होती.