सातारा : शॉक लागून महावितरणचे दोन कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 02:12 PM2018-07-31T14:12:54+5:302018-07-31T14:13:21+5:30

महामार्गालगत खेड परिसरात असणाऱ्या विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना मंगळवारी दुपारी अकरा वाजता शॉक लागून दोन कर्मचारी जखमी झाले.

Satara: Two employees of Mahavitaran got injured due to shock | सातारा : शॉक लागून महावितरणचे दोन कर्मचारी जखमी

सातारा : शॉक लागून महावितरणचे दोन कर्मचारी जखमी

Next
ठळक मुद्देशॉक लागून महावितरणचे दोन कर्मचारी जखमी

सातारा : महामार्गालगत खेड परिसरात असणाऱ्या विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना मंगळवारी दुपारी अकरा वाजता शॉक लागून दोन कर्मचारी जखमी झाले.

याबाबत माहिती अशी की, पुणे-बेंगलोर महामार्गावर महेंद्र हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या महावितरण कंपनीच्या डीपीवर मंगळवारी सकाळी अकरा वाजता दुरुस्तीचे काम सुरू होते.

दुरुस्तीचे काम करण्यासाठी महावीर भरत गुरव (वय २७, रा. संगमनगर, ता. सातारा) व एकनाथ विठ्ठल शिंदे (वय ५६, रा. भीमनगर, सातारारोड ता. कोरेगाव) हे खांबावर चढले होते.

यावेळी खांबावर विजेचा शॉक लागल्याने दोघे जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Satara: Two employees of Mahavitaran got injured due to shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.