सातारा : सिंमेट घेऊन निघालेल्या ट्रकची कारला धडक, माळशिरसचे दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 04:14 PM2018-04-26T16:14:39+5:302018-04-26T16:14:39+5:30

चौकातील रस्ता ओलांडत असलेल्या कारला सिंमेट घेऊन निघालेल्या ट्रकने ठोकर दिली. यामध्ये कारमधील दोघेजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी पहाटे मायणी-म्हसवड मार्गावर मायणीपासून सहा किलोमीटर अंतरावरील पडळ-विखळे चौकांमध्ये झाला.

Satara: Two trucks collided with a cement gun, and two of Malshirsa injured | सातारा : सिंमेट घेऊन निघालेल्या ट्रकची कारला धडक, माळशिरसचे दोघे जखमी

सातारा : सिंमेट घेऊन निघालेल्या ट्रकची कारला धडक, माळशिरसचे दोघे जखमी

Next
ठळक मुद्देसिंमेट घेऊन निघालेल्या ट्रकची कारला धडक, माळशिरसचे दोघे जखमी मायणीजवळ चौकात रस्ता ओलांडताना अपघात

मायणी : चौकातील रस्ता ओलांडत असलेल्या कारला सिंमेट घेऊन निघालेल्या ट्रकने ठोकर दिली. यामध्ये कारमधील दोघेजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी पहाटे मायणी-म्हसवड मार्गावर मायणीपासून सहा किलोमीटर अंतरावरील पडळ-विखळे चौकांमध्ये झाला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अकलूजकडून अमोल दिलीप मगर हे कारने (एमएच ४५ एन ११४१) इस्लामपूरकडे निघाले होते. त्यांची कार गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास पडळ-विखळे चौकात आली. त्याचवेळी कातरखटावहून कलेढोणकडे मालट्रक (एमएच १३ एक्स ३८६१) सिमेंट घेऊन निघाला होता.

ही दोन्ही वाहने पडळ-विखळे चौकात एकमेकांना क्रॉस होताना या दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये कार चालकाच्या बाजूचे मोठे नुकसान झाले. कार चालकाच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, अमोल मगर यांचा पाय व हात निकामी झाले.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी मदतीसाठी धावले. दरम्यान, १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून दोघांना वडूज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Web Title: Satara: Two trucks collided with a cement gun, and two of Malshirsa injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.