सातारा : मित्राला भेटायला जाताना अपघात, भरधाव टेम्पोच्या धडकेत दोन युवक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 07:30 PM2018-03-03T19:30:48+5:302018-03-03T19:30:48+5:30
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील गौरीशंकर कॉलेज परिसरात भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे दोघे भुर्इंज येथे असलेल्या मित्राला भेटण्यासाठी जात होते. हा अपघात शनिवारी दुपारी एकच्या सुमारास झाला.
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील गौरीशंकर कॉलेज परिसरात भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे दोघे भुर्इंज येथे असलेल्या मित्राला भेटण्यासाठी जात होते. हा अपघात शनिवारी दुपारी एकच्या सुमारास झाला.
समीर धिल्लनसिंग (वय २४), गणेश माने (वय २०,रा. चंदनगर, कोडोली सातारा) अशी जखमी युवकांची नावे आहेत. समीर आणि गणेश हे दोघे साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम करत आहेत. साताऱ्याहून भुर्इंजकडे ते दोघे मित्राला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते.
गौरीशंकर कॉलेज परिसरात पोहोचल्यानंतर पाठीमागून आलेल्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही दूरवर फेकले गेले. काही नागरिकांनी या दोघांना खासगी वाहनाने तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दोघांनाही हाता पायाला गंभीर जखम झाली आहे. या अपघातानंतर टेम्पो चालक तेथून पसार झाला आहे. या अपघाताची अद्याप सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.