सातारा : गोंदवलेत कोठी पूजनाला साकारली अनोखी कलाकृती, ब्रह्मचैतन्य महाराज समाधी सजवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 01:18 PM2018-12-24T13:18:33+5:302018-12-24T13:22:31+5:30

गोंदवले येथील श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या १0५ व्या पुण्यतिथी महोत्सवाला रविवारी पासून पहाटे कोठी पूजनाने सुरुवात झाली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोठी पुजनानिमित्त फळे, भाज्या, भांड्यांच्या आकर्षक रचनेतून बनवलेली आरास पाहण्यासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Satara: Unique artwork which was started by Gondawela Kothi Pooja, Brahmchaitanya Maharaj Samadhi Sajwali | सातारा : गोंदवलेत कोठी पूजनाला साकारली अनोखी कलाकृती, ब्रह्मचैतन्य महाराज समाधी सजवली

गोंदवले बुद्रुक श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या १0५ व्या पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात कोठी पूजनाने झाली.

Next
ठळक मुद्देगोंदवलेत कोठी पूजनाला साकारली अनोखी कलाकृती, ब्रह्मचैतन्य महाराज समाधी सजवलीफळे, भाज्या, भांड्यांच्या आकर्षक, रचनेतून बनवली आरास

म्हसवड : गोंदवले येथील श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या १0५ व्या पुण्यतिथी महोत्सवाला रविवारी पासून पहाटे कोठी पूजनाने सुरुवात झाली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोठी पुजनानिमित्त फळे, भाज्या, भांड्यांच्या आकर्षक रचनेतून बनवलेली आरास पाहण्यासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

ब्रम्हानंद महाराजांनी घालून दिलेल्या पद्धतीनुसारच येथील समाधी मंदिर समितीच्या वतीने मार्गशिर्ष वद्य प्रतिपदा ते वद्य दशमी पर्यंत श्रींचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पहाटे समाधी मंदिर परिसरातील मुख्य सभामंडपात सकाळी साडेसहा वाजता वेदघोष ईशस्तवन आणि सुमधूर गायनाने सुरुवात झाली, त्यानंतर श्री ब्रम्हचैतन्य महाराज व श्री ब्रम्हानंद महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

समाधी मंदिर समितीचे विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या पादुकांचे मध दुध दही चंदन पंचामृत याने लेप देत गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. पूजन झाल्यानंतर अक्षय पिशवीतील पैशाना पंचामृताने अभिषेक घालून विधीवत पूजन करण्यात आले. गोशाळेत गाईंचे पूजन करण्यात आले. त्यांना प्रसाद खाऊ घालण्यात आला, तसेच कोठीपूजन करण्यात आले. स्वयंपाकघरातील चुलींचे देखील पूजन करण्यात आले.

स्वयंपाक गृहात स्वयंपाकसाठी लागणाऱ्या ताट मोठी पातेली, वाट्या, चमच्या, पळी भात वाडी यां वस्तूंची आरास करण्यात आली. स्वयंपाकघरातही भट्ट्यांचे पूजन करण्यात आले. तसेच कडधान्य यांची दैदिप्यमान आरास करण्यात आली होती.

यावेळी सुमारे तेराशे मक्याची कणसाचा वापर करून एक नऊ फूट उंच कणसाची प्रतिकृती तयार करून त्यात कोणताही कृत्रिम रंग ना लावता काही ठिकाणी कमी अधिक भाजून हुबेहूब सुंदर अशी श्री ब्रम्हचैतन्य महाराजांची कलाकृती बनवण्यात आली असून त्याच्या साईडला हिरव्या मक्याच्या ताटांची आरास बघण्यासाठी खूप गर्दी केली होती. ही कलाकृती चिंचवड येथील प्रशांत कुलकर्णी यांनी साकारली आहे. मंदिरात सुध्दा फुलांची आरास केली होती
कोठीपूजनाच्या या कार्यक्रमानंतर मुख्य समाधी मंदिरात अखंड पहारा बसविण्यात आला.

आरास पाहण्यासाठी गर्दी

कोठीपूजनानिमित्त यंदाही कोठीमध्ये डाळींब, ढब्बू मिरची, संत्री, केळी, दांगदा, टोमॅटो, अननस आणि विविध वस्तू फळे भाज्यांच्या वापरातून आकर्षक आरास करण्यात आली होती. स्वयंपाकघरातही विविध लहानमोठी भांडी व वस्तू
वापरुन आकर्षक मांडणी करण्यात आली होती. या आरास पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
 

Web Title: Satara: Unique artwork which was started by Gondawela Kothi Pooja, Brahmchaitanya Maharaj Samadhi Sajwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.