सातारा : व्यावसायिकांच्या विरोधामुळे तीन तास अतिक्रमण मोहीम खोळबंली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 04:19 PM2018-02-09T16:19:02+5:302018-02-09T16:25:51+5:30

काही नागरिकांनी स्वत:ची दुकाने हटविण्यास विरोध केल्याने अतिक्रमण विरोधी मोहीम तब्बल तीन तास खोळंबली. गेल्या चार दिवसांपासून साताऱ्यांत अतिक्रमण मोहीम सुरू आहे. या मोहिमेला पोलिस बंदोबस्तही पुरविण्यात आला आहे.

Satara: Violence of professionals has led to the encroachment campaign for three hours | सातारा : व्यावसायिकांच्या विरोधामुळे तीन तास अतिक्रमण मोहीम खोळबंली

सातारा : व्यावसायिकांच्या विरोधामुळे तीन तास अतिक्रमण मोहीम खोळबंली

Next
ठळक मुद्देअतिक्रमण विरोधी मोहीम तब्बल तीन तास खोळंबलीमोहिमेला पोलिस बंदोबस्त

सातारा : काही नागरिकांनी स्वत:ची दुकाने हटविण्यास विरोध केल्याने अतिक्रमण विरोधी मोहीम तब्बल तीन तास खोळंबली.
गेल्या चार दिवसांपासून साताऱ्यांत अतिक्रमण मोहीम सुरू आहे. या मोहिमेला पोलिस बंदोबस्तही पुरविण्यात आला आहे.

अतिक्रमण काढण्यापूर्वी अनेकांना तोंडी व लेखी नोटिसा बजावल्या आहेत. स्वत:हून अतिक्रमण काढण्याचे आवाहन पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले होते. मात्र, अनेकांनी अद्यापही रस्त्याच्या शेजारून खोकी हटविली नाहीत. आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही, अशी भूमिका काही व्यावसायिकांनी घेतली आहे. त्यामुळे अतिक्रमण विभाग या लोकांशी चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते.

बळाचा वापर करण्यापेक्षा गोड बोलून अतिक्रमण काढण्यावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा भर आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सुरू होणारी मोहीम दुपारी दोन वाजले तरी सुरू नव्हती. काही व्यावसायिकांनी विरोध केल्यामुळे ही मोहीम खोळंबली होती. अखेर त्यांची समजूत काढल्यानंतर अतिक्रमण मोहीम पोवई नाक्यावर पुन्हा सुरू करण्यात आली.

 

Web Title: Satara: Violence of professionals has led to the encroachment campaign for three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.