सातारा : शाहू कला मंदिरची संरक्षण भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 04:13 PM2018-08-28T16:13:50+5:302018-08-28T16:14:42+5:30
सातारा येथील शाहू कला मंदिरची १५ फूट उंच असलेली संरक्षण भिंत मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने ही भिंत शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडवर न कोसळता आतल्या बाजूला पडली.
सातारा : येथील शाहू कला मंदिरची १५ फूट उंच असलेली संरक्षण भिंत मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने ही भिंत शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडवर न कोसळता आतल्या बाजूला पडली.
शाहू कला मंदिराची संरक्षण भिंत फार पूर्वीपासूनची आहे. गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने ही भिंत कमकुवत झाली होती. सोमवारी सायंकाळी ही भिंत कलल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले होते.
कोणत्याही क्षणी ही भिंत पडण्याची शक्यता होती. या भिंतीशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लाँड्री आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. या भिंतीमुळे तेथून ये-जा करणारे नागरिक चिंता व्यक्त करत होते.
दरम्यान, मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास ही भिंत अचानक कोसळली. मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी शाहू कला मंदिराकडे धाव घेतली. मात्र, ही भिंत पत्र्याच्या शेडच्या बाजूला न पडता शाहू कला मंदिराच्या आतील बाजूस पडल्याने नुकसान टळले.