सातारा : खोदकाम करताना पाणी लागल्याची अफवा, पाईप फुटल्यामुळे तलावासारखी स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 04:14 PM2018-03-21T16:14:52+5:302018-03-21T16:24:33+5:30
पोवई नाक्यावर खोदकाम करताना पाईप फुटल्यामुळे मोठ्या डबक्यात पाणी साचले असून, तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सातारा : पोवई नाक्यावर खोदकाम करताना पाईप फुटल्यामुळे मोठ्या डबक्यात पाणी साचले असून, तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पोवई नाक्यावरील भुयारी मार्गाचे पाडव्याच्या मुहूर्तावर काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे काम सुरू झाले आहे. जेसीबीच्या साह्याने खोदकाम करताना अचानक पाण्याची पाईप फुटली गेली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर आले. खोदलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचले असून, तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयाला होणारा पाणीपुरवठा त्यामुळे खंडित झाला आहे. तसेच सदर बझारमध्येही कमी प्रमाणात पाणीपुरवठा झाला आहे. दरम्यान, पोवई नाक्यावर खोदकाम करताना पाणी लागल्याची अफवा शहरात पसरली होती. त्यामुळे अनेकांनी पोवई नाक्याकडे धाव घेतली. मात्र, पाण्याची पाईप फुटली गेली असल्याचे तेथील कामगारांनी सांगितले.