सातारा : झाडं जगविण्यासाठी टँकरने पाणी, अळजापुरात ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:56 PM2018-03-22T12:56:00+5:302018-03-22T12:56:00+5:30
फलटण तालुक्यातील आळजापूर तेथे वनविभागाने गेल्या हंगामात लावलेल्या वृक्षाची वाढ चांगली झाली. उन्हाळ्याची तिव्रता वाढल्याने झाडे जळून जाण्याची भीती वर्तविली जात आहे. झाडे जगविण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्यातून वन विभागाने प्रयत्न सुरू केले असून टँकरने पाणी पुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
आदर्की (सातारा) : फलटण तालुक्यातील आळजापूर तेथे वनविभागाने गेल्या हंगामात लावलेल्या वृक्षाची वाढ चांगली झाली. उन्हाळ्याची तिव्रता वाढल्याने झाडे जळून जाण्याची भीती वर्तविली जात आहे. झाडे जगविण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्यातून वन विभागाने प्रयत्न सुरू केले असून टँकरने पाणी पुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
आंदरूड ते आदर्कीपर्यतच्या डोंगररांगा व टेकड्या हिरव्यागार होण्यासाठी फलटण वन विभाग प्रयत्न करीत आहे. वनविभागाने हिंगणगाव येथे नर्सरीची निर्मिती केले. तेथे बिया व फांद्यापासून रोपांची लागण करताना बिया निजंर्तूक केल्या. पाच किलोच्या थैलीत माती व खते भरल्याने रोपाची उगवन क्षमता चांगली असल्याने वाढही चांगली होत आहे.
वनक्षेत्रात जून ते जुलै महिन्यात लावलेली झाडे पावसाळ्यात चांगली वाढली आहेत. पण आता उन्हामुळे ते करपू लागली आहेत. कष्टाने लावलेल्या झाडांना जीवनदान देण्यासाठी वनविभागाने टँकरद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली.