Satara: बायकोने फोन उचलला नाही म्हणून ब्लेडने वार, पसरणीतील धक्कादायक घटना

By दत्ता यादव | Published: October 10, 2023 11:05 AM2023-10-10T11:05:13+5:302023-10-10T11:05:38+5:30

Satara Crime News: पत्नीने फोन न उचलल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीच्या मानेखाली तसेच दोन्ही हाताच्या मनगटाखाली ब्लेडने सात ते आठ वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली. 

Satara: Wife stabbed with blade for not picking up phone, shocking incident in Satara | Satara: बायकोने फोन उचलला नाही म्हणून ब्लेडने वार, पसरणीतील धक्कादायक घटना

Satara: बायकोने फोन उचलला नाही म्हणून ब्लेडने वार, पसरणीतील धक्कादायक घटना

- दत्ता यादव
सातारा - पत्नीने फोन न उचलल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीच्या मानेखाली तसेच दोन्ही हाताच्या मनगटाखाली ब्लेडने सात ते आठ वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली. ही धक्कादायक घटना पसरणी, ता. वाई येथे दि. ८ रोजी पहाटे साडेपाच वाजता घडली. याप्रकरणी पतीवर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल बाळकृष्ण येवले (वय ३५, रा. पसरणी, ता. वाई) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल येवले व पत्नी प्रियंका (वय ३२) हे दोघेही वाईतील एका कंपनीत वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. घटनेच्या आदल्या दिवशी सायंकाळी पत्नीच्या फोनवर राहुलने फोन केला. मात्र, त्याचा फोन पत्नीने उचलला नाही. कामावरून घरी गेल्यानंतर राहुलने ‘तू कुठे होतीस, माझा फोन का उचलला नाहीस,’ असे म्हणून वाद घातला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी पहाटे कामावर जाताना याच कारणावरून पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. राहुलने कपाटावरील ब्लेड घेऊन पत्नी प्रियंका हिच्या मानेखाली तसेच दोन्ही हाताच्या मनगटाच्याखाली मारून तिला गंभीर जखमी केले. सात ते आठ वार तिच्या शरीरावर केल्याने तिला वाईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पत्नीचा जबाब नोंदविल्यानंतर राहुल येवलेवर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक श्रीनिवास बिराजदार हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Satara: Wife stabbed with blade for not picking up phone, shocking incident in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.