सातारा : युवकालाला चेष्टा मस्करी भोवली; मित्राने भिरकावलेल्या दगडामुळे पडले दोन दात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:30 PM2018-01-23T15:30:20+5:302018-01-23T15:36:31+5:30
चेष्टा मस्करी एका युवकाला चांगलीच भोवली असून, मित्राने भिरकावलेल्या दगडामुळे चक्क त्याचे दोन दात पडले. यामध्ये संबंधित युवकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. धीरज रविंद्र धस्के (वय १७, रा. वर्णे ता. सातारा) असे जखमी युवकाचे नाव आहे.
सातारा : चेष्टा मस्करी एका युवकाला चांगलीच भोवली असून, मित्राने भिरकावलेल्या दगडामुळे चक्क त्याचे दोन दात पडले. यामध्ये संबंधित युवकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
धीरज रविंद्र धस्के (वय १७, रा. वर्णे ता. सातारा) असे जखमी युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धीरज आणि त्याचे मित्र सोमवारी सायंकाळी त्याच्या घरासमोर गप्पा मारत बसले होते. यावेळी चेष्टा मस्करीत एका युवकाने शिवीगाळ केली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला.
हा वाद इतका विकोपाला गेला की, त्याच्या मित्राने धीरजच्या तोंडावर दगड भिरकविला. त्यामध्ये त्याच्या ओठ्याला मोठी भेग पडली तर पुढील दोन दात पडले. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी त्याच्या ओठावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आठ टाके पडले आहेत. सध्या त्याला बोलता येत नसून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.