सातारा : लग्न ठरत नसल्याचे युवकाची आत्महत्या, वाई तालुक्यातील बदेवाडी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:36 PM2018-05-04T12:36:23+5:302018-05-04T12:36:23+5:30

लग्न ठरत नसल्याने आलेल्या नैराश्येतून वाई तालुक्यातील बदेवाडी येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन नामदेव शेंडगे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

Satara: Youth suicide due to not being married, Badewadi incident in Y Taluka | सातारा : लग्न ठरत नसल्याचे युवकाची आत्महत्या, वाई तालुक्यातील बदेवाडी येथील घटना

सातारा : लग्न ठरत नसल्याचे युवकाची आत्महत्या, वाई तालुक्यातील बदेवाडी येथील घटना

Next
ठळक मुद्देलग्न ठरत नसल्याचे युवकाची आत्महत्यावाई तालुक्यातील बदेवाडी येथील घटनाघरातील लोखंडी अ‍ॅँगलला घेतला गळफास

पाचवड : लग्न ठरत नसल्याने आलेल्या नैराश्येतून वाई तालुक्यातील बदेवाडी येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन नामदेव शेंडगे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत भुर्इंज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नितीन शेंडगे हा कामकाजानिमित्त दि. १ रोजी भुर्इंज येथे आला होता. गुरुवारी रात्री तो बदेवाडी येथे आला. विमल देठे यांच्या घरी जेवण केल्यानंतर नितीन रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झोपण्यासाठी निघून गेला. झोपण्यापूर्वी त्याने घराचा दरवाजा आतून बंद केला.

रात्री बराच वेळ दरवाजा न उघडल्याने नितीनचे वडील नामदेव शेंडगे यांनी याबाबतची माहिती जावई बाळासाहेब कांबळे यांना दिली. यानंतर कांबळे यांनी दरवाजा उघडला असता, नितीनने लोखंडी अ‍ॅँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, नितीनचे लग्न ठरत नसल्याने तो नैराश्येखाली वावरत होता. याच कारणातून त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नामदेव शेंडगे यांनी भुर्इंज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलीस तपास करीत आहेत.
 

Web Title: Satara: Youth suicide due to not being married, Badewadi incident in Y Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.