सातारा जिल्हा परिषद आरक्षण जाहीर; खुल्या प्रवर्गासाठी ४५ जागा, ३७ गट महिलांसाठी राखीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 01:12 PM2022-07-29T13:12:02+5:302022-07-29T13:12:29+5:30
सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांची पाच वर्षांची मुदत २० मार्चला संपली.
सातारा : मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी आरक्षण सोडत झाली. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेसाठी ७३ पैकी ३७ गट महिलांसाठी राखीव झाले आहेत. तर सर्व मिळून खुला प्रवर्ग ४५, ओबीसी १९, अनुसूचित जाती ८ आणि जमातीसाठी एक गट आहे.
सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांची पाच वर्षांची मुदत २० मार्चला संपली. पण, त्यावेळी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी सत्तेवरील महाविकास आघाडी सरकारने कायदा करून निवडणूक पुढे ढकलली होती. गुरुवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी आरक्षण सोडत झाली. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि महसूलचे उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी आरक्षण सोडत जाहीर केली.
त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी ४५ जागा, ओबीसींसाठी १९ तर अनुसूचित जाती ८ आणि अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव झाली. तर खुल्या प्रवर्गातील २३, ओबीसी प्रवर्ग १० आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील ४ गट महिलांसाठी राखीव झाले. एकूण ७३ पैकी ३७ गट सर्व प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.
खुला प्रवर्ग ६, ओबीसींचे २ सदस्य वाढले...
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्हा परिषद गटांची संख्या वाढविण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील गटांची संख्या ९ ने वाढून ६४ वरून ७३ वर गेली. यामध्ये खुला प्रवर्ग ६, ओबीसी २ आणि अनुसूचित जातीचा एक सदस्य वाढला आहे.
तालुकानिहाय गट असे राहणार
सातारा १० ,कऱ्हाड १४ , वाई ०५, महाबळेश्वर ०२, माण ०५, खटाव ०८, कोरेगाव ०६, जावळी ०३, खंडाळा ०३, पाटण ०८, फलटण ०९
२ ऑगस्टपर्यंत हरकती
जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षणावर कोणाच्या हरकती असतील तर त्या २ ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर अंतिम आरक्षण ५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.
तालुकानिहाय गट आरक्षण असे :
खंडाळा तालुका
शिरवळ - सर्वसाधारण महिला
भादे - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
खेड बुद्रुक- नागरिकांचा मागास प्रवर्ग
फलटण तालुका
सर्वसाधारण गट
तरडगाव, साखरवाडी, सांगवी, विडणी, गुणवरे, बरड, हिंगणगाव
सर्वसाधारण महिला - कोळकी, वाठार निंबाळकर
माण तालुका
आंधळी, बिदाल - सर्वसाधारण महिला
मार्डी, गोंदवले बुद्रुक, कुकुडवाड - सर्वसाधारण
खटाव तालुका
बुध, पुसेगाव, खटाव, निमसोड, पुसेसावळी, मायणी - सर्वसाधारण
सिद्धेश्वर कुरोली - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
औंध - सर्वसाधारण महिला
कोरेगाव तालुका
पिंपोडे बुद्रुक - नागरिकांचा मागास प्रवर्ग
सातारारोड - अनुसूचित जाती
कुमठे - सर्वसाधारण -
एकंबे, वाठार किरोली, वाठार स्टेशन - सर्वसाधारण महिला
वाई तालुका
पसरणी - सर्वसाधारण
केंजळ - अनुसूचित जमाती
ओझर्डे- नागरिकांचा मागास प्रवर्ग
बावधन - अनुसूचित जाती
भुईंज - सर्वसाधारण महिला
महाबळेश्वर तालुका
तळदेव - सर्वसाधारण महिला
भिलार - सर्वसाधारण महिला
जावळी तालुका
म्हसवे - सर्वसाधारण महिला
कुडाळ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
कुसुंबी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
सातारा तालुका
लिंब, पाटखळ, देगाव, नागठाणे - सर्वसाधारण महिला
खेड, कारी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
कोडोली - अनुसूचित जाती
कोंडवे, पाडळी - नागरिकांचा मागास प्रवर्ग
अपशिंगे सर्वसाधारण
पाटण तालुका
गोकुळ तर्फ हेळवाक - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
तारळे, मारुल हवेली - सर्वसाधारण
म्हावशी, धामणी - सर्वसाधारण महिला
मल्हारपेठ, नाटोशी - अनुसूचित जाती महिला
मंद्रुळकोळे - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
कऱ्हाड तालुका
पाल, वारुंजी, कार्वे, काले - सर्वसाधारण महिला
उंब्रज, सैदापूर, रेठरे बुद्रुक - नागरिकांचा मागास प्रवर्ग
मसूर - सर्वसाधारण
कोपर्डे हवेली, येळगाव - अनुसूचित जाती महिला
चरेगाव, विंग, वडगाव हवेली - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
तांबवे - अनुसूचित जाती
विंग - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला