केरळच्या पूरग्रस्तांसाठी सातारकर गाळतायत घाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:59 PM2018-09-07T23:59:56+5:302018-09-08T00:00:00+5:30

Satarakar Ghatitya Gham for Kerala flood victims ... | केरळच्या पूरग्रस्तांसाठी सातारकर गाळतायत घाम...

केरळच्या पूरग्रस्तांसाठी सातारकर गाळतायत घाम...

googlenewsNext

रहिमतपूर : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकर धावून गेले आहेत. कन्नूर या गावात संत निरंकारी मंडळाच्या सेवा दलाचे १०७ सदस्य गाळ काढणे व साफसफाईचे काम करताना घाम गाळत आहेत.
संत निरंकारी मंडळाच्या प्रमुख सुधीक्षा महाराज यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा झोनमधील सेवादल जवान केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. केरळ येथील कन्नूर या गावात सेवाकार्य सुरू असून, ११ सप्टेंबरपर्यंत हे काम सुरू राहणार आहे, अशी माहिती सातारा झोनचे प्रमुख नंदकुमार झांबरे यांनी दिली.
केरळमध्ये पुरामुळे खूप मोठी हानी झाली आहे; परंतु पूर ओसरल्यानंतर ठिकठिकाणी कचऱ्याचे व गाळाचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी खरी आवश्यकता आहे ती मनुष्यबळाची. हे ओळखून निरंकारी मंडळाच्या प्रमुख सुधीक्षा माताजी यांनी सेवादल व चॅरिटेबल फाउंडेशनच्या जवानांना केरळमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून सेवा करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातून १०७ सेवादलाचे सदस्य सेवाकार्य करत आहेत. निरंकारी मंडळाच्या माध्यमातून आवश्यक्यता लागेल तिथे मनुष्यबळ पुरवले जात आहे. प्रत्येक टीमला दहा दिवसांसाठी कामाचे नियोजन करण्यात आले आहे. परत दुसºया विभागातील सेवादलाची टीम पुढील काम करणार आहे.
इमारतीजवळ तीन फुटांपेक्षा जास्त गाळ...
देशभरातून हजारो सेवा दलाचे जवान केरळमध्ये दाखल होत आहेत. यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस दलामधील अधिकाºयाचाही समावेश आहे. हे सेवा दलाचे जवान केरळमध्ये नेमून दिलेल्या ठिकाणी कचरा साफ करण्याचे काम करीत आहेत. प्रत्येक गावात गाळ व कचरा सफाईचे काम वेगात सुरू करण्यात आले आहे. तसेच काही गावांमध्ये इमारतीमध्ये जवळपास तीन फुटांपेक्षा जास्त गाळ साचला आहे. तो बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. रस्ते पूर्ण वाहून गेले आहेत. ते दुरुस्तीचेही काम सुरू आहे. मानसिक व आर्थिक धक्क्यातून अजून केरळवासीय सावरले नाहीत. रोगराई पसरू नये, यासाठीही दक्षता घेतली जात आहे.

Web Title: Satarakar Ghatitya Gham for Kerala flood victims ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.