सातारकरांची थंडी जाता जाईना...गारठा कायम, १४ अंशाच्या खाली तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:56 PM2020-12-05T17:56:06+5:302020-12-05T17:58:38+5:30

Winter Session Maharashtra, Mahabaleshwar Hill Station, Satara area सातारा जिल्ह्यात चार दिवसांपासून थंडी कायम असून, शनिवारी साताऱ्यात किमान तापमान १३.०३ अंश नोंदले गेले. त्यामुळे गारठा कायम आहे. तर सायंकाळपासून सकाळी नऊपर्यंत थंडी चांगलीच जाणवत आहे.

Satarakar's cold will not go away ... Gartha remains: Temperature below 14 degrees in Satara | सातारकरांची थंडी जाता जाईना...गारठा कायम, १४ अंशाच्या खाली तापमान

सातारकरांची थंडी जाता जाईना...गारठा कायम, १४ अंशाच्या खाली तापमान

Next
ठळक मुद्देसातारकरांची थंडी जाता जाईना...गारठा कायम साताऱ्यात १४ अंशाच्या खाली तापमान

सातारा : जिल्ह्यात चार दिवसांपासून थंडी कायम असून, शनिवारी साताऱ्यात किमान तापमान १३.०३ अंश नोंदले गेले. त्यामुळे गारठा कायम आहे. तर सायंकाळपासून सकाळी नऊपर्यंत थंडी चांगलीच जाणवत आहे.

जिल्ह्यात नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून थंडी पडत आहे. मात्र, यावर्षी थंडीत सतत चढ-उतार सुरू आहे. दिवाळीत साताऱ्यातील किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले होते. त्यामुळे थंडीचा कडाका पडला होता. मात्र, दिवाळीनंतर काही दिवस थंडी गायब झाली होती. परिणामी साताऱ्यासह जिल्ह्यातील किमान तापमान २० अंशावर पोहोचले होते. मात्र, त्यानंतर किमान तापमानात उतार आला. तसेच थंडी जाणवू लागली.

जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पुन्हा थंडी वाढू लागली आहे. किमान तापमान १५ अंशाच्या खाली आले आहे. त्यामुळे गारठा चांगलाच जाणवतोय. १ डिसेंबरला साताऱ्यातील किमान तापमान १८.०४ अंश होते. तर २ डिसेंबरला १७.०२, ३ ला १४.०५, ४ डिसेंबरला १२.०९ आणि ५ डिसेंबरला १३.०३ अंशाची नोंद झाली. साताऱ्यासह जिल्ह्यातील किमान तापमान अजूनही १५ अंशाच्या खाली आहे. त्यामुळे थंडी जाणवत आहे.

Web Title: Satarakar's cold will not go away ... Gartha remains: Temperature below 14 degrees in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.