मराठा मोर्चात सातारकरांचे औदार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 11:03 PM2017-08-11T23:03:30+5:302017-08-11T23:03:34+5:30

Satara's generosity in Maratha marcha | मराठा मोर्चात सातारकरांचे औदार्य

मराठा मोर्चात सातारकरांचे औदार्य

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मुंबईत झालेल्या न भूतो न भविष्यती अशा मराठा मोर्चातील हजारो मावळ्यांच्या खाण्या-पिण्यासह निवाºयाची सोय पडद्यामागे राहून काम करणाºया वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशनने केली होती. विशेष म्हणजे, या आॅर्गनायझेशनमध्ये पाचशे पेक्षाही अधिक कार्यकर्ते सातारा जिल्ह्यातील असून, या ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण पिसाळ हे सध्या ठाणेवासीय असले तरी मूळचे कोरेगाव तालुक्यातील किन्हईचे.
वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन ही मुख्यत्वे मराठा तरुणांच्या शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी कार्य करणारी संस्था असून, मुंबई क्रांती मोर्चातील मराठा बांधवांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्यासाठी ही कार्यरत झाली.
या कार्यात वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन संघटनेचे जितू काकडे, रुपाली पाटील, विजय दांगट, अ‍ॅड. उदय चव्हाण, जयदीप पाटील, अवधूत सूर्यवंशी, जगदीश पाटील, राज पाटील, समाधान पवार, दीपक धावणे, प्रवीण पिसाळ, शीतल चोपडे, डॉ. कांचन पाटील, डॉ. मानसी पवार तसेच वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रवीण पिसाळ व अन्य अनेक सहकाºयांनी रात्रंदिवस सहभाग दर्शविला.
पुण्यातील एका मिनरल वॉटर कंपनीच्या मदतीने आणि अतुल पिसाळ यांच्या सहकार्याने मुंबई मराठा मोर्चाच्या दिवशी २०,००० पाणी बॉटल्सचे मोफत वाटप करण्यात आले. रेल्वेने मोर्चासाठी मोठा जमाव छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे येणार हे ओळखून प्रवीण पिसाळ यांनी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ५,००० वडापावचे मोफत वाटप केले.
दीपक धावणे यांनीही अजून एका ठिकाणी मोफत पाणी वाटप करून कार्याला हातभार लावला. मराठा क्रांती मोचार्साठी वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन मार्फत झालेल्या या भरीव कामगिरीचे मराठा समाजातील बांधवांनी भरभरून कौतुक केले. वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन सारख्या ‘बांधणीस्वरूप’, ‘क्रियाशील’ आणि ‘सकारात्मक’ कार्य करणाºया संघटनेला मराठा बांधवांनी सहकार्य करायलाच हवे.
मुक्कामासाठी नवी मुंबईत सोय...
मोर्चासाठी लाखो मराठा बांधव मुंबईत येणार या विचाराने वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन संस्थेने आपल्या मराठा बांधवांसाठी मोफत राहण्याची, नाश्ता-भोजनाची तसेच पाण्याची व्यवस्था करण्याचे ठरविले. किमान २५००-३००० लोक राहू शकतील, अशा नवी मुंबईच्या नेरुळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनमध्ये व्यवस्था करण्यात आली. ८ आॅगस्टच्या संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत मराठा बांधवांचे लोंढे हॉलवर येत होते. अगदी एका वेळी ६ बसेस भरून त्या रात्री लोक राहण्यासाठी आले होते. तसेच अनेक लहान मोठ्या गाड्या भरून लोक रात्रभर येत होते. या सर्वांची व्यवस्थित सोय याठिकाणी करण्यात आली.

Web Title: Satara's generosity in Maratha marcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.