साताऱ्याच्या खासदाराचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:10 PM2019-05-22T23:10:05+5:302019-05-22T23:10:09+5:30
सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला धडक देऊन तो जिंकण्यासाठी ...
सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला धडक देऊन तो जिंकण्यासाठी शिवसेना-भाजप युतीने जोरदार तयार केली होती. या निवडणुकीत आघाडी व युती यांच्यात जोरदार घमासान होणार, हे निश्चित आहे.
यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात भाजप-शिवसेनेने माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी-काँगे्रस आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीने साताºयाची उमेदवारी प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीने यंदा खासदार उदयनराजे भोसले यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. तर त्यांच्याविरोधात भाजप-शिवसेनेने माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
दोन्ही बाजूंनी विजयासाठी जोर लावण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँगे्रसला उदयनराजेंच्या विजयाबाबत भरवसा आहे. उदयनराजेंचे मताधिक्क्य किती असेल?, याविषयी मात्र सर्वांनाच चिंता वाटते. यंदा उदयनराजे ४ लाखांपेक्षा जास्त लीडने निवडून येतील, असे त्यांचे नजीकचे कार्यकर्ते छातीठोकपणे सांगत आहेत. त्याउलट मागील विधानसभा निवडणुकीत ६ मतदार संघातून भाजपला ४ लाखांच्या आसपास मते मिळाली होती. नंतरच्या काळात अनेकांनी भाजप-सेनेत प्रवेश केल्याने नरेंद्र पाटील यांचा विजय होईल, असे अंदाज बांधले जात आहेत. गेल्या महिनाभरापासून निकालाबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे.
मतमोजणी प्रक्रिया चालते तरी कशी?
सातारा: 'सातारा लोकसभा मतदार संघासाठी सातारा एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होईल. मतमोजणीच्या पारदर्शकतेसाठी मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभानिहाय २० टेबल ठेवण्यात येणार आहेत. एकूण २३ फेºया झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल.
पोस्टल मतदान मोजणी
पोस्टल मतमोजणी टपाली व सैनिक मतमोजणीसाठी प्रत्येक सहा टेबलवर मतमोजणी होणार आहे. सुरुवात टपाली मतांच्या मोजणीने होईल. सैनिक मतदारांचे पोस्टल मतदानाच्या लखोट्यावरील क्यूआर कोड स्कॅनिंग करण्यासाठी २० टेबलची मांडणी करण्यात येणार आहे.
व्हीव्हीपॅटवरील चिठ्ठ्यांची मोजणी
सातारा लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ढोबळ पद्धतीने निवडलेल्या ५ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटवरील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार आहे. त्या विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणी कक्षामध्ये सहायक निवडणूक अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली मोजणी करण्यात येणार आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची मत जुळवली जाणार आहेत.
२0 मतमोजणी प्रतिनिधी
प्रत्येक विधानसभा मतदार संघात ईव्हीएम मतमोजणीकरिता २० मतमोजणी प्रतिनिधी याप्रमाणे एकूण १२० निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्ष, बारकोड रीडिंग कक्षात प्रत्येकी एक, टपाली मतपत्रिका मतमोजणीसाठी सहा असे एकूण १२८ प्रतिनिधी नियुक्त केले आहेत.
फेरीनिहाय चित्र स्पष्ट
सातारा लोकसभा मतदार संघातील वाई-२३, कोरेगाव-१८, कºहाड उत्तर-१७, कºहाड-दक्षिण-१६, पाटण-२०, सातारा-२३ अशा फेºया होणार आहेत. कºहाड दक्षिणमध्ये केवळ १६ मशीन असल्याने सर्वात आधी त्यांचा निकाल लागणार आहे. त्यानंतर कºहाड उत्तर, कोरेगाव, पाटण, सातारा आणि वाई असा निकाल लागणार आहे.