सातारच्या प्रांताधिकाऱ्याला अटक

By admin | Published: November 20, 2014 12:18 AM2014-11-20T00:18:56+5:302014-11-20T00:19:21+5:30

बनावट यूएलसी प्रकरण : सहीने प्रमाणपत्र दिल्याचे निष्पन्न

Satara's Principal arrested | सातारच्या प्रांताधिकाऱ्याला अटक

सातारच्या प्रांताधिकाऱ्याला अटक

Next

पुणे : राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी)ने बनावट यूएलसी प्रकरणामध्ये सातारचे प्रांताधिकारी संजय कुंडेतकर यांना बुधवारी अटक केली. यूएलसीची बनावट प्रमाणपत्रे कुंडेतकरच्या स्वाक्षरीने देण्याचे आल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे अधीक्षक
बी. आर. पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २०१० मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सीआयडीची आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये कुंडेतकर हे दोषी आढळून आले आहे. दोन दिवसांपूर्वी सीआयडीने शासकीय रेकॉर्डकिपर प्रतिभा खाडे हिच्यासह तिचा पती शशिकांत खाडे या दोघांना अटक केली आहे. खाडे हिने पतीच्या मदतीने रेकॉर्डमध्ये फेरफार केल्याचेही तपासात समोर आले आहे. शशिकांत याने पत्नीच्या कामात मदत केल्यामुळे त्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या. तपासादरम्यान यूएलसी प्रमाणपत्रे ही तत्कालीन अधिकारी कुंडेतकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. बुधवारी सकाळी सीआयडीच्या एका पथकाने त्यांना सातारहून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुण्यामध्ये आणण्यात आले. पुण्यामध्ये आणल्यानंतर प्राथमिक चौकशी करुन त्यांना अटक करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Satara's Principal arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.