सातारच्या प्राध्यापकाचा पोलिसांवर हल्ला

By admin | Published: June 25, 2015 01:03 AM2015-06-25T01:03:02+5:302015-06-25T01:08:34+5:30

शिराळ्यात धिंगाणा

Satara's professor attacked the police | सातारच्या प्राध्यापकाचा पोलिसांवर हल्ला

सातारच्या प्राध्यापकाचा पोलिसांवर हल्ला

Next

शिराळा : मोटारीने धडक दिल्याचा जाब विचारणाऱ्या दुचाकीस्वाराच्या मागे लागलेल्या प्राध्यापकाने बुधवारी शिराळ्यात धिंगाणा घातला.
त्याला पकडण्यास गेलेल्या दोन पोलिसांवर कोयत्याने वार करून पोलीस ठाण्याच्या काचाही त्याने फोडल्या. डॉ. विजय अर्जुन पवार (वय ३८, सातारा, सध्या रा. शिराळा) असे त्याचे नाव आहे. या हल्ल्यात अनुज विश्वासराव पाटील (३२) आणि अनिल श्रीरंग पाटील (३०) हे पोलीस जखमी झाले. याबाबत दुचाकीस्वार विश्वास निवृत्ती महिंद (३८, रा. शिराळा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
विजय पवार सातारा येथील आर्टस् अ‍ॅँड कॉमर्स महाविद्यालयात अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे, तर त्याची पत्नी शिराळा येथे नोकरीस आहे. त्याचे मूळ गाव कोल्हापूर असून, तो येथील पाटील कॉलनीत राहतो. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान तो मोटारीने (क्र. एमएच ०९ बीएक्स १८१६) घराकडे निघाला होता. न्यायालयासमोर त्याने तीन दुचाकींना धडक दिली. त्यापैकी विश्वास महिंद हे दुचाकीस्वार धडक दिल्याचा जाब विचारण्यास पवारकडे गेले.
त्यावेळी पवारने मोटारीतील कोयता काढला. कोयता घेऊन मारण्यासाठी तो त्यांच्यामागे धावला. त्यावेळी महिंद यांनी समोर असलेल्या पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.
पवारच्या हातातील कोयता धरून त्याला पकडण्यासाठी पोलीस शिपाई अनुज पाटील आणि अनिल पाटील सरसावले. यावेळी पवारने प्रवेशव्दाराच्या दरवाज्याच्या काचा आणि आरसा फोडला. या झटापटीत अनुज पाटील यांच्या कोपरावर कोयत्याचा वार बसला, तर अनिल पाटील यांच्यावरही वार झाला. यात दोघे जखमी झाले. त्यानंतर विजय पवार याला पकडण्यात यश आले.
विजय पवार याच्याविरुध्द शासकीय मालमत्तेचे नुकसान, शासकीय कामात अडथळा आणणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
वैफल्यातून मनोरुग्ण
विजय पवार याच्या आईने सांगितले की, शिराळ्यातील जमीन खरेदीत फसल्याने तो वैफल्यग्रस्त झाला असून, तीन दिवसांपासून मनोरुग्णासारखा वागत आहे. मंगळवारी सातारा येथील त्याच्या मित्रांना त्याला घेऊन जाण्यासाठी कळविले होते. त्यानुसार बुधवारी त्याचे मित्र त्याला नेण्यास आले होते. मंगळवारीच त्याने शिराळा पोलिसांत अज्ञात व्यक्ती आपला पाठलाग करीत असून, आपल्या जीवीतास धोका आहे, अशी तक्रार दिली होती. जीवीतास धोका असल्याच्या भीतीपोटी तो संरक्षणासाठी मोटारीत कोयता ठेवत होता.

Web Title: Satara's professor attacked the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.