साताऱ्याच्या ‘समाजकल्याण’ला पुण्याचा टेकू ! : दहा वर्षांत ११ जणांकडे प्रभारी कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:13 PM2018-12-12T23:13:09+5:302018-12-12T23:14:25+5:30
नितीन काळेल। सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाला दहा वर्षांपासून अधिक करून प्रभारी अधिकाºयाचाच टेकू असून, आतातर ...
नितीन काळेल।
सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाला दहा वर्षांपासून अधिक करून प्रभारी अधिकाºयाचाच टेकू असून, आतातर पुण्याच्या अधिकाºयाकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारीही पुण्यातील काम पाहून आठवड्यातून काही दिवस येतात. परिणामी दूरवरून येणाºया लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दहा वर्षांत फक्त एकाच अधिकाºयाला तीन वर्षे पूर्ण करता आली असून, तब्बल ११ जणांकडे प्रभारीचा चार्ज होता, हे विशेष.
जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग महत्त्वपूर्ण आहे. या विभागाच्या वतीने अनूसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. याचा लाभ गरजूपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते, त्यासाठी कार्यालयातील यंत्रणा काम करते. समाजकल्याण अधिकाºयाच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांचे कामकाज चालते.
त्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला स्वतंत्र एक अधिकारी आहे; पण गेल्या दहा वर्षांत सातारा जिल्हा परिषदेच्या या कार्यालयाला पूर्णवेळ व कायमस्वरुपी अधिकारी फार कमी वेळा मिळाल्याचे दिसून आले आहे. वारंवार प्रभारी अधिकाºयाकडे पद्भार देण्यात आला आहे. आता तर पुणे येथील सहायक आयुक्त कार्यालयातील समाजकल्याण अधिकारी हरीश डोंगरे यांच्याकडे साताºयाचा प्रभारी पद्भार आहे.
नवीन प्रभारी समाजकल्याण अधिकारी दर सोमवारी साताºयाच्या कार्यालयात येतात. दिवसभर कामे करतात. तसेच मंगळवारी ते थांबून असतात; पण पुण्याचा कार्यभारही त्यांच्याकडे असल्याने त्यांना तिकडेही जावे लागते. त्यामुळे दोन्हीकडील पद्भार पाहताना तारेवरची कसरत होत आहे. अनेकवेळा जिल्ह्याच्या दूरवरच्या भागातून ग्रामस्थ कामानिमित्त जिल्हा परिषदेत येतात. त्यांना अधिकाºयांना भेटायचे असते. समस्या सांगायच्या असतात; पण येथे आल्यावर अधिकाºयाची भेट नाही झाली तर हेलपाटा मारावा लागतो, त्यासाठी वेळ आणि पैसाही वाया जातो. मोबाईलवरून अधिकाºयाशी संपर्क होतो; पण कामाच्या निपटाºयाचे काय? असाही प्रश्न लोकांना पडतो. त्यामुळे कायमस्वरुपी अधिकारी असणे आवश्यक ठरले आहे.
कांबळे तीन वर्षे अधिकारी...
समाजकल्याण विभागाचा गेल्या दहा वर्षांचा विचार करता तब्बल ११ जणांकडे प्रभारी पद्भार राहिला आहे. तर ए. पी. कांबळे यांनी पूर्ण तीन वर्षे अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच पी. एस. कवटे यांनी दहा महिने, यू. एम. घुले यांनी ६ महिने, स्वाती इथापे यांनी सव्वादोन वर्षे तर ए. एस. बन्ने यांनी ३ आणि ७ महिने असे दोनवेळा पूर्णवेळ कारभार पाहिला आहे.
साताºयातील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात दर सोमवारी हजर असतो. जिल्ह्यातील कोणतेही काम पाठीमागे राहणार नाही, याची काळजी घेण्यात येते. आठवड्यातून चार दिवसतरी साताºयात येण्याचा प्रयत्न असतो. शासनाने दिलेली जबाबदारी पार पाडत असून, १०० टक्के न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो.
- हरीश डोंगरे,
प्रभारी समाज कल्याण अधिकारी (सातारा)