साताऱ्यात रविवारी विधी सेवा महाशिबीराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 02:43 PM2019-08-02T14:43:32+5:302019-08-02T14:44:58+5:30
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ४ रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विधी सेवा महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कुंभोजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ४ रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विधी सेवा महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कुंभोजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांच्याशी निगडीत शासनाच्या सेवा योजना, कायदे, नियम यांची माहिती नसल्याने अनेकवेळा ते हक्क मिळविण्यापासून वंचित राहतात म्हणून विद्यार्थी आणि पालकांना त्यांचे हक्क आणि अधिकार तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व्हावी, यासाठी, यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या महाशिबीराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश केतकर, पालक न्यायमूर्ती सातारा जिल्हा महेश सोनके यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शिबीरामध्ये एकूण १९ शासकीय विभागांचा सहभाग असणार असून विद्यार्थी आणि पालकांसाठी विविध शासकीय विभागांमार्फत स्टॉलच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. सातारा शहर व परिसरातील एकूण ६० शाळा, महाविद्यालये सहभागी होणार आहेत. अंदाजे ९ हजार विद्यार्थी व पालक याचा लाभ घेणार आहेत. या महाशिबीरात काही दाखलेही वितरित केले जाणार आहेत.