सातारी दातृत्वाने कोकणवासी भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:39 AM2021-07-31T04:39:06+5:302021-07-31T04:39:06+5:30

सातारा : पुरामुळे प्रचंड नुकसान झालेल्या आपल्या मूळगावातील संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सातारचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सुहास ...

Satari philanthropy overwhelmed the people of Konkan | सातारी दातृत्वाने कोकणवासी भारावले

सातारी दातृत्वाने कोकणवासी भारावले

Next

सातारा : पुरामुळे प्रचंड नुकसान झालेल्या आपल्या मूळगावातील संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सातारचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी वेहेळे (ता. चिपळूण) येथे धाव घेतली. एस. टी.च्या कर्तव्यदक्ष आगारप्रमुखांचा त्यांनी यावेळी गौरव केला.

‘परशुरामाच्या भूमीत उडालेला हाहाकार पाहवत नाही. घामाचे सिंचन करून वाढवलेली पिके आणि काडी-काडी जमवून उभारलेले संसार मातीमोल झाले आहेत. अशास्थितीत माझ्या आवाक्यात आहे, तेवढी मदत मी घेऊन आलो आहे,’ असे त्यांनी सांगताच गावकऱ्यांनाही भावना अनावर झाल्या. ‘महापुराने होत्याचे नव्हते केले’, असे गावकरी अश्रू ढाळून सांगत होते. नुकसानाची पाहणी करून गावकऱ्यांना धीर देतानाच सुहास राजेशिर्के यांनी त्यांना शिध्याचे किट, कोरडा खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या दिल्या. ‘जाळल्याशिवाय पिकणार नाही, असा परशुरामाचा कोकणभूमीला शाप असतानासुद्धा कष्टाळू कोकणी माणूस रान पिकवतो. याही संकटातून तो धीराने मार्ग काढेल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, एस. टी.च्या चिपळूण आगाराचे प्रमुख रणजित राजेशिर्के यांचा त्यांनी चिपळूणमध्ये सत्कार केला. महापुराचे पाणी एस. टी. आगारात शिरले असताना त्यांनी सातजणांचा जीव वाचवला होता तसेच एस. टी. महामंडळाची नऊ लाखांची रोकड घेऊन ते इतरांसह नऊ तास एस. टी.च्या टपावर बसून राहिले. जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावल्याबद्दल सुहास राजेशिर्के यांनी त्यांचा गौरव केला. यावेळी संजय रसाळ, संजय मोहिते, सचिन साळवी, शशिकांत भोजने, चालक भगवान गोटमुलके यांचाही राजेशिर्के यांनी सत्कार केला.

फोटो :

नगरसेवक सुहास राजेशिर्के यांच्या हस्ते चिपळूण आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Satari philanthropy overwhelmed the people of Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.