बाप्पाला निरोप देण्यासाठी सातारकर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:38 AM2021-09-19T04:38:53+5:302021-09-19T04:38:53+5:30

सातारा : विसर्जनासाठी पालिकेने जलतरण तलाव व चार कृत्रिम तळ्यांची उभारणी केली आहे. तसेच ठिकठिकाणी पाण्याचे कुंड व ...

Satarkar ready to bid farewell to Bappa | बाप्पाला निरोप देण्यासाठी सातारकर सज्ज

बाप्पाला निरोप देण्यासाठी सातारकर सज्ज

googlenewsNext

सातारा : विसर्जनासाठी पालिकेने जलतरण तलाव व चार कृत्रिम तळ्यांची उभारणी केली आहे. तसेच ठिकठिकाणी पाण्याचे कुंड व निर्माल्य कलशाची व्यवस्थाही केली आहे.

गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जिल्हा तसेच पालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. पालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही जलतरण तलावासह हुतात्मा स्मारक, कल्याणी शाळा, दगडी शाळा व बुधवार नाका येथे कृत्रिम तळ्यांची उभारणी केली आहे. या तळ्यांमध्ये पाणीसाठा करण्यात आला असून, बॅरिकेटिंग, वीज, मूर्ती विसर्जनासाठी मचाण अशी कामेही पूर्ण झाली आहेत.

बुधवार नाक्यावरील सर्वात मोठ्या कृत्रिम तळ्यात दहा दिवसांच्या व गणेश मंडळांच्या मूर्तींचेच विसर्जन केले जाणार आहे. विसर्जनासाठी शंभर टन वजनाची हायड्रोलिक क्रेन पुण्याहून मागवली आहे. सर्वच तळ्यांवर सुरक्षारक्षकांची नेमणूकही केली आहे. तसेच शहरातील वाहतूकही वळविण्यात आली असून, मोती चाैकाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

(चौकट) दोनशे पोलीस तैनात

विसर्जन मिरवणुकीला बंदी घातली असली, तरी पोलिसांनी दरवर्षीप्रमाणे सातारा शहरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. जवळपास दोनशे पोलीस कर्मचारी शहर व परिसरात तैनात करण्यात आले आहेत. विशेषत: विसर्जन मार्गावर पोलिसांची संख्या सर्वाधिक असणार आहे.

(चौकट) सीसीटीव्हीचा वाॅच...

जिल्हा पोलीस दलाच्यावतीने शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा विसर्जन मार्गावर पालिकेकडून सीसीटीव्ही बसवले जाणार नाहीत. परंतु, सुरक्षिततेसाठी चार कृत्रिम तळी व तलतरण तलाव येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे गणेशभक्तांवर लक्ष ठेवणार आहेत.

चाैकट : हे नियम पाळावेत...

- कृत्रिम तळ्यांवर सकाळी सात ते सायंकाळी सात यावेळेत मूर्ती विसर्जन केले जाईल.

- विसर्जनासाठी घरातील केवळ दोन सदस्यांना परवानगी राहील.

- विसर्जनस्थळी आरती होणार नाही, त्यामुळे विसर्जनाला येण्यापूर्वीच आरती करावी.

- फिजिकल डिस्टन्सचे पालन व मास्कचा वापर बंधनकारक आहे.

- दि. १९ सप्टेंबर रोजी बुधवार नाक्यावरील मोठ्या तळ्यात गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होईल.

चाैकट : विसर्जनासाठी कुंडांची व्यवस्था

फुटका तलाव ६

मंगळवार तळे ६

गौखले हौद १

पंताचा गोट १

रामाचा गोट ३

विश्वेश्वर मंदिर ३

न्यू इंग्लिश स्कूल १

करिअप्पा चौक सदर बझार २

शाहूपुरी ग्रामपंचायत १

फोटो : जावेद खान

Web Title: Satarkar ready to bid farewell to Bappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.