लंडनमध्ये सातारकरांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:30 AM2017-09-03T00:30:11+5:302017-09-03T00:31:06+5:30

 Satarkar's dalliance in London | लंडनमध्ये सातारकरांचा जल्लोष

लंडनमध्ये सातारकरांचा जल्लोष

Next
ठळक मुद्दे सार्वजनिक गणेशोत्सवात पुढाकार : थेम्स नदीकाठची मिरवणूक पाहून ब्रिटिश नागरिक चकितढोलाच्या तालावर जसं जमेल तसं ठेका धरायचा प्रयत्न करू लागली.

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : संपूर्ण महाराष्ट्रात डॉल्बी बंदीचा आदर्श निर्माण करणाºया सातारकरांनी आता सातासमुद्रापार जावून आपल्या उत्साहाचा झेंडा अटकेपार रोवला आहे. ब्रिटन देशातील लंडनमध्येही यंदा गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक काढून भारतीयांनी आपल्या शिस्तबद्धतेचे दर्शन तमाम लंडनवासियांना दिले. विशेष म्हणजे या मिरवणुकीचे व्यवस्थापन एका सातारकराकडेच होते.

‘हौनस्लोव’ भागातील भारतीयांच्या गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक वाजत-गाजत हळूहळू थेम्स नदीकडं सरकू लागली, तशी बघ्यांची संख्या वाढू लागली. लंडनवासीयांसाठी हा प्रकार अनोखा होता. आगळा-वेगळा होता. काहीजणांच्या चेहºयावर आश्चर्य होतं तर काही जणांना उत्सुकता. ‘व्हिक्टोरिया’ नामक एक वयस्कर ब्रिटन महिलाही या मिरवणुकीत स्वत:हून सामील झाली. ढोलाच्या तालावर जसं जमेल तसं ठेका धरायचा प्रयत्न करू लागली.

खरंतर, तिला हे जमत नव्हतं, तरीही भारतीय गणेशभक्तांनी तिला सपोर्ट केला. चिअर-अप केलं. मग काय.. ब्रिटनच्या रक्तालाही जणू उधाण आलं. अस्सल मराठमोळ्या संगीतावर लंडनकरांचे पाय थिरकू लागले.या मंडळासाठी भारतातूनच गणेशमूर्ती मागविण्याचा निर्णय झाला. मुंबईतल्या अनेक मूर्तिकारांची नावं सर्च करण्यात आली. अनेकांकडून फोटोज्ही मागविण्यात आले. अखेर एक सुबक मूर्ती फायनल झाली. मुंबईहून लंडनला ही मूर्ती व्यवस्थित पाठविण्यासाठी एका कुरिअर कंपनीला ठेका देण्यात आला.

आज ‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत...
आजपावेतो घरगुती स्वरुपात साजरा केला जाणारा लंडनचा गणेशोत्सव यंदा मोठ्या थाटामाटात सार्वजनिकरित्या साजरा केला गेला. विसर्जनाच्या मिरवणुकीची जबाबदारी मूळ साताºयात राहणाºया एका तरुणाने स्वत:हून घेतली होती. श्रेयस शेटे यांच्या व्यवस्थापनाखाली निघालेल्या अनोख्या मिरवणुकीत ब्रिटिश नागरिकांनीही ढोल-ताशांच्या तालावर नृत्य सादर केले. त्याचीच चित्रकथा आजच्या ‘लोकमत’मधील ‘मंथन’ पुरवणीत पान ८ वर...

लंडन शहरातील हौनस्लोव्ह भागात मराठी भाषिकांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात साताºयातील तरुणांचा पुढाकार लक्षणीय होता.

Web Title:  Satarkar's dalliance in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.