सातारकरांचे वैद्यकीय महाविद्यालय आले दृष्टिक्षेपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:54 AM2021-01-02T04:54:18+5:302021-01-02T04:54:18+5:30
सातारा : जिल्ह्यात पायाभूत सुविधेच्या कामावर गेल्या काही वर्षांपासून विशेष भर देण्यात आला. सातारा जिल्ह्यासाठी मंजूर असलेले शासकीय वैद्यकीय ...
सातारा : जिल्ह्यात पायाभूत सुविधेच्या कामावर गेल्या काही वर्षांपासून विशेष भर देण्यात आला. सातारा जिल्ह्यासाठी मंजूर असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या अनुषंगाने काम सुरू झाले आहे. जागा हस्तांतरासाठी ६१ कोटी रुपयांचा निधी वित्त विभागाने मंजूर केला आहे. सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरचे महत्त्वाकांक्षी काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, सातारा शहराला एक नवा चेहरा मिळाल्याचे आता दिसत आहे. जिहे कठापूर ही दुष्काळी भागासाठी वरदायी ठरणारी योजनादेखील आता अंतिम टप्प्यात आहे. ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे बांधकाम पूर्ण झाले. याच संग्रहालयाचा वापर हा जम्बो कोविड हॉस्पिटलसाठी करण्यात येत आहे.
प्रकल्पांची ज्योत
सातारकरांचे स्वप्न असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा हस्तांतरासाठी सरकारने ६१ कोटींचा निधी दिला.
सातारा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. पोवई नाका परिसरात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन महत्त्वाकांक्षी ग्रेड सेपटरेटरचे काम पूर्णत्वास आले.
सातारा येथे छ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या अंतिम कामासाठी निधी उपलब्ध झाला. बांधकाम पूर्ण झाले. आता इतर कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.