सातारकरांचीही आता ‘घुमान’ वारी...

By Admin | Published: March 29, 2015 11:14 PM2015-03-29T23:14:13+5:302015-03-30T00:10:52+5:30

साहित्यनगरी सजणार सातारी झेंड्याने : कुलकर्णी दाम्पत्याने बनविले उपरणे, बॅचेस, आबदागिरी

Satarkar's name is 'Swaminarayan'. | सातारकरांचीही आता ‘घुमान’ वारी...

सातारकरांचीही आता ‘घुमान’ वारी...

googlenewsNext

नितीन काळेल -सातारा -एप्रिल महिन्याच्या प्रारंभी पंजाब राज्यातील घुमान येथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संत नामदेव महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या नगरीतील साहित्य संमेलनात सातारकरांचाही मोठा सहभाग राहणार आहे. कारण, संपूर्ण साहित्य संमेलन सजणार आहे, ते सातारी झेंडे, उपरणे, आबदागिरी, बॅचेसनी. हे सर्व साहित्य साताऱ्यातील मंदार आणि नूतन कुलकर्णी या दाम्पत्याने बनविले आहे. नुकतेच झेंडे, टोप्या, बॅचेस, उपरणे हे घुमान येथे पोहोचही झाले आहेत.संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी म्हणून पंजाबमधील घुमानकडे पाहिले जाते. अनेक वर्षे संत नामेदव महाराजांनी पंजाबमध्ये भागवत धर्माची
पताका फडकविली. त्यांच्या कर्मभूमीतच म्हणजे घुमान येथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी हे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनस्थळ व संपूर्ण घुमाननगरी सजणार आहे, ते सातारी झेंडे, पताक्यांनी.
सातारा शहरातील मंदार आणि नूतन कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनात लागणारे झेंडे, पताका, आबदागिरी, टोप्या, बॅचेस बनविले आहेत. यामध्ये प्रथमच पंचकोनी, तोरण झेंड्यांचाही समावेश झालेला आहे. साहित्यिकांच्या स्वागतासाठी विविध रंगी पट्टे तयार करण्यात आले आहेत. अशा विविध वस्त्रांनी घुमान नगरी सजणार आहे. ग्रंथपालखीच्या वेळीही साहित्यिकांच्या हातात देण्यासाठी छोटे झेंडे बनविण्यात आले आहेत. साहित्य संमेलनाचा उद्घाटन कार्यक्रम आणि समारोपासाठीही महावस्त्रे बनविण्यात आली आहेत. संमेलनातील परिसंवादात सहभागी होणाऱ्या मान्यवरांसाठी आठवण राहावी म्हणून आकर्षक असे वस्त्रही तयार करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे सातारकरांचा झेंडा पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात फडकणार आहे. सातारकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

ज्ञानदीप लावू जगी--साताऱ्यात तयार करण्यात आलेल्या या वस्त्रांवर साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रिंट केले आहे. त्यामध्ये संत नामदेव महाराज यांचे चित्र आहे. त्याखाली नामदेव महाराजांचा ‘नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी,’ ही अभंगातील ओळ आहे. तसेच पुस्तक, दौत, आणि मोरपीस यांची चिन्हेही समाविष्ट केलेली आहेत.


साहित्य संमेलन म्हणजे भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा महोत्सव आहे. आमच्या घराण्यात संत आणि वारकरी पंरपरा आहे. त्यामुळेच साहित्य संमेलनासाठी लागणारे झेंडे, उपरणे, आबदागिरी बनविण्याचे काम आम्हाला मिळाले असावे. सातारच्या झेंडे, पताकांनी घुमाननगरी सजणार असल्याने तो सर्व सातारकरांचा सन्मान असणार आहे.
- नूतन कुलकर्णी

Web Title: Satarkar's name is 'Swaminarayan'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.