साताºयात पिवळं वादळ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 10:44 PM2017-07-28T22:44:17+5:302017-07-28T22:46:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : रामोशी समाजबांधव अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करत आहेत. शासनाकडे वारंवार मागणी करून दुर्लक्ष केले जाते, असा आरोप करत न्याय हक्कासाठी रामोशी समाजातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात हजारो समाजबांधव सहभागी झाले. त्यांनी हातात घेतलेल्या पिवळ्या झेंड्यामुळे साताºयात जणू भगवं वादळच संचारलं होतं.
मोर्चात खासदार उदयनराजे भोसलेही सहभागी झाले होते. ‘सर्वसामान्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू,’ अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालयातून साजरी करावी. त्यांचे छायाचित्रे सर्व कार्यालयांना उपलब्ध करून देण्याबाबत परिपत्रक काढावे. धनदांडग्यांनी बळकावलेल्या व इनाम वर्ग अ, ब च्या वतनी जमिनी रामोशी समाजाला परत कराव्यात. भिवडी येथे क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी निधीची तरतूद करावी. समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. बेरड, रामोशी व त्यांच्या तत्सम जमातींचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करावा.
कृतिसमितीचा मोर्चा
आंदोलनकर्त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, इंग्रजांविरोधात सशस्त्र क्रांतीचे पहिले बंड पुकारणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती ७ सप्टेंबर २०१६ रोजी महाराष्ट्र बेडर, बेडर रामोशी समाज कृती समितीच्या वतीने राजभवन भिवडी स्मारक येथे झाली. परंतु या राष्ट्रपुरुषाच्या महान कार्याचा व क्रांतिकारी रामोशी समाजाचा या शासनाला विसर पडला आहे. निवेदन, माहिती अनेक वर्षे देऊनही कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळेच रामोशी समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या वंचित आहे. त्यामुळे बेडर, रामोशी समाज कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येत आहे.