त्रिशंकू भागातील समस्या सोडविल्याचे समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:43 AM2021-09-21T04:43:30+5:302021-09-21T04:43:30+5:30
सातारा : आमदार फंडासह शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून त्रिशंकू भागात सातत्याने विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावली आहेत. ...
सातारा : आमदार फंडासह शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून त्रिशंकू भागात सातत्याने विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावली आहेत. या भागातील सर्व प्रकारच्या समस्या सातत्याने सोडवल्या आणि यापुढेही सोडवू, असे आश्वासक प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून विसावा पार्कमधील अंतर्गत रस्त्यासाठी आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम या योजनेतून १२ लाख ७५ हजार रुपये निधी मंजूर झाला. या रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरणाचा प्रारंभ आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवाजी ढाणे, विलास पवार, डॉ.दीपक निकम, ॲड.संजय भोसले, डॉ.अमोल ढवळे, दत्ताजी भोसले, ओंकार तिखे, हरेश दोशी, यतीन दोशी, ईशान दोशी, राजन पोरे, संजय निकम, प्रसाद कुलकर्णी, एस.एन. कुलकर्णी, रमेश जाधव, चंद्रकांत भोसले, पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, रवि पवार, राजेंद्र राजे, ओमकार भंडारे आदी उपस्थित होते.
आ.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘हद्दवाढ झाली, तरच त्रिशंकू भागाचा विकास होणार आहे. या दूरदृष्टीतून सातारा पालिकेचा हद्दवाढीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने मंजूर करून घेतला. आता त्रिशंकू भाग पालिका हद्दीत आल्याने, या भागातील मूलभूत सुविधांसह सर्व प्रकारच्या समस्या सोडवू आणि खऱ्या अर्थाने या भागाचा कायापालट करू,’ असा शब्द आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला.
फोटो : २० शिवेंद्रसिंहराजे भोसले
साताऱ्यातील विसावा पार्क येथील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.