संमेलनाध्यक्ष बिनविरोध निवडीत सातारकरांचे योगदान : विनोद कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:27 AM2018-07-03T00:27:37+5:302018-07-03T00:31:03+5:30

Satkarkar's contribution to elected unanimously elected president: Vinod Kulkarni | संमेलनाध्यक्ष बिनविरोध निवडीत सातारकरांचे योगदान : विनोद कुलकर्णी

संमेलनाध्यक्ष बिनविरोध निवडीत सातारकरांचे योगदान : विनोद कुलकर्णी

Next

सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड ही निवडणुकीद्वारे न होता बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही सातारकर आग्रही होतो, त्यामुळेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात घटना दुरुस्ती होऊ शकली,’ अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी दिली.

पत्रकात म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक झाली. तेव्हापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर निवड झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत पहिल्यांदा सातारा जिल्ह्याच्या वतीने संमेलनाध्यक्षाची निवड सन्मानाने व्हावी. निवडणुकीद्वारे होऊ नये, असा प्रस्ताव मांडला.

संमेलनाध्यक्ष फक्त एक हजार व्यक्तींकडून ठरवले जाते. ते समाजमान्य नाही. निवडणुकीमुळे अनेक मान्यवर लेखकांना संमेलनाध्यक्षाची संधी मिळालेली नव्हती. त्यात मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि अशा अनेक साहित्यिकांची नावे सांगता येतील. विश्व साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यांचीही निवड बिनविरोध होते. सन्मानपूर्वक ते पद दिले जाते तर मग अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड का नाही, अशी भूमिका मांडली होती. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हेही या मताला अनुकूल होते. प्

रा. मिलिंद जोशी यांनी व्यापक भूमिका घेतली आणि ५७ वर्षे जी प्रथा सुरू होती ती बदलण्यासाठी हा ठराव मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी केल्यानंतर ‘मसाप’च्या कार्यकारिणीने ती एकमताने मान्य केले. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत ‘मसाप’च्या या भूमिकेमुळे बिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब करणारी घटना दुरुस्ती झाली. विदर्भ साहित्य संघ पहिल्यापासूनच बिनविरोध निवडीसाठी आग्रही होता. मसाप, पुणे यांनीही तीच भूमिका घेतल्यामुळे त्यांना बळ मिळाले आणि ही घटना दुरुस्ती मंजूर झाली. अनेक नामवंत साहित्यक जे निवडणुकीच्या मैदानात येऊ इच्छित नाही त्यांना हे पद सन्मानाने देता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याने घेतलेल्या पुढाकारामुळे हे घडले. अखिल भारतीय पातळीवर सातारा जिल्ह्याची यानिमित्ताने दखल घेतली गेली. यामध्ये जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, सोपान चव्हाण आणि सर्व साहित्य परिषदेच्या सभासदांचा पुढाकार होता.

भविष्यात साताऱ्यात संमेलन होईल
‘अखिल भारतीय साहित्य महामंडळ तीन वर्षांसाठी विदर्भाकडे आहे. हे शेवटचे वर्ष विदर्भाकडे महामंडळाची धुरा राहणार आहे. दोन वर्षे विदर्भाबाहेरच संमेलन झाल्याने शेवटचे संमेलन महामंडळ विदर्भात असताना व्हावे, अशी विदर्भवासीयांची भूमिका होती. त्यांच्या आग्रही भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी मसाप, शाहूपुरी साताºयाने आपला आग्रह सोडला; परंतु भविष्यात येत्या दोन-तीन वर्षांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताºयात होईल,’ असा विश्वासही विनोद कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

Web Title: Satkarkar's contribution to elected unanimously elected president: Vinod Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.