बाप्पांच्या स्वागताला सातारकर सज्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:37 PM2019-09-01T23:37:28+5:302019-09-01T23:37:33+5:30
सातारा : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या गणेशोत्सवास सोमवारी प्रारंभ होत आहे. साताऱ्याची बाजारपेठ फुलली आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी सातारकर ...
सातारा : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या गणेशोत्सवास सोमवारी प्रारंभ होत आहे. साताऱ्याची बाजारपेठ फुलली आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी सातारकर सज्ज झाले आहेत. काही गणेशोत्सव मंडळांनी शनिवारपासून मिरवणूक काढून
मूर्ती घेऊन जात आहेत. रविवारी
सर्वत्र सातारकरांनी गर्दी केली
होती.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साताºयाची बाजारपेठ गेल्या काही दिवसांपासून सजली आहे. गल्ली, गावात इतरांपेक्षा आपलाच बाप्पा वेगळा असावा, यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यामुळे सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी साताºयाच्या बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून गर्दी होत आहे. शाळा-महाविद्यालय, नोकरदारांना रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी झाली होती.
विद्युत सजावटीसाठी आकर्षक माळा, मखर, मंदिर, पडदे, तोरण, झुरमुळ्या खरेदीसाठी तरुणाई तसेच दिवा, पणती, रांगोळी, रंगीत रांगोळी, फळे, मोदक घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.
बाहेरगावच्या अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवारी मूर्ती साताºयातून नेल्या. तर साताºयातील काही मंडळांनी मिरवणूक काढून मूर्ती मंडळात नेली. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरूच होत्या. त्यानिमित्ताने मिरवणूक मार्गावर रांगोळी घालण्यात आली होती. घरगुती बाप्पा सोमवारी घरी नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची प्रतिष्ठापना करण्यात
येईल.
दरम्यान, गणेशोत्सव शांततेत
पार पडावा, यासाठी सातारा पोलिसांनी शहरातून शनिवारी रात्री संचलन केले. दरम्यान, सोमवारपासून सुरू होणाºया गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबईहून असंख्य चाकरमानी साताºयात आले. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांना गर्दी जाणवत होती.