महिलांसाठी शनिवारी रंगांची उधळण
By Admin | Published: March 27, 2015 10:48 PM2015-03-27T22:48:47+5:302015-03-27T23:59:28+5:30
‘रंगात रंगूया... चला रंग खेळूया’ या रंगपंचमी कार्यक्रमाचे आयोजन
सातारा : येथील महिला आणि युवतींसाठी २८ मार्चला ‘रंगात रंगूया... चला रंग खेळूया$’ या रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.इयत्ता दहावी बारावी आणि स्कॉलरशीप परीक्षांमधून मोकळा श्वास घेतलेल्या सर्व युवती व महिलांसाठी ‘लोकमत संखी मंच’ने खास हा कार्यक्रम आयोजित केला आहे. बऱ्याचदा रंगपंचमीचा मनमुराद आनंद महिलांना घेता येत नाही. त्यामुळेच सखी मंचने खास महिलांसाठी रंगपंचमीचा हा अनोखा उत्सव आयोजित केला आहे.या कार्यक्रमामध्ये प्रत्येक महिन्यातील लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. यामध्ये ‘कास हॉलिडेज’ तर्फे एका सखीला चार व्यक्तींसह एक दिवसीय राहणे, जेवण मोफ त, आनंद कृषी पर्यटन केंद्र यांच्या तर्फे तीन सखींना एक दिवसीय पॅकेज, हॉटेल सुर्वेज तर्फे दहा सखींना जेवण मोफ त, इम्पे्रशन ब्युटी पार्लर तर्फे पाच सखींना फेशियल मोफत, दोन सखींना एस. एस. एंटरप्रायझेस तर्फे इलेक्टॉनिक इस्त्री मोफ त मिळणार आहे. लकी ड्रॉचे कूपन जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते, ती संपूर्ण जाहिरात कट करून घेणे आवश्यक आहे.रेनडान्समध्ये भिजून जाण्यासाठी, अन् डॉल्बीच्या तालावर थिरकण्यासाठी, रंगपंचमीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सदस्यांनी आणि इतर महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत सखी’ मंचच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
हत्तीखाना शाळेच्या प्रांगणात सायं. ४ वाजल्यापासून रंगणाऱ्या या कार्यक्रमात सखींना डॉल्बीच्या तालावर रेनडान्सची मजा अनुभवता येणार आहे. कार्यक्रमस्थळी सखी मंच, बालविकास मंच, सदस्यांना आणि युवा नेक्स्टमधील फक्त युवतींना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. इतर महिला आणि युवतींसाठी १०/- प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. सदस्यांनी सोबत ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे.
फक्त महिलांसाठीचे विशेष आयोजन असलेल्या या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व दर्जेदार आणि खात्रीशीर उत्पादने असलेल्या ‘प्रकृती जियो फ्रेश’ आणि महिलांसाठी सतत कार्यरत असणाऱ्या, वेगवेगळ्या योजना राबवणाऱ्या ‘जिजाऊ प्रतिष्ठान’ने स्वीकारले आहे.
महिलांनी रंग स्वत: घेऊन येणे आवश्यक आहे, फक्त नैसर्गिक रंग वापरावेत.