साताऱ्यात पाणी टंचाईच्या काऊंटडाऊनला सुरुवात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:19 PM2019-05-05T23:19:20+5:302019-05-05T23:19:25+5:30

पेट्री : सातारा शहरात पाणीटंचाईचे ढग जमा होऊ लागले असून, आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला ...

Saturn water scarcity countdown begins! | साताऱ्यात पाणी टंचाईच्या काऊंटडाऊनला सुरुवात !

साताऱ्यात पाणी टंचाईच्या काऊंटडाऊनला सुरुवात !

Next

पेट्री : सातारा शहरात पाणीटंचाईचे ढग जमा होऊ लागले असून, आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहराला पाणीपुरवठा करत असलेल्या कास तलावात केवळ सात फूट चार इंच पाणीसाठा शिल्लक आहे. तलावाचा दुसरा व्हॉल्व्हही उघडा पडला असल्याने पाणीटंचाईचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे मानले जात आहे.
सातारा शहराला पाणीपुरवठा करणाºया कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत आहे. पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागली आहे. तलावाचा दुसरा व्हॉल्व्ह उघडा पडला असून, शेवटच्या तिसºया व्हॉल्व्हमधून पाणीपुरवठा सुरू आहे. सद्य:स्थितीला तलावात केवळ सात फूट चार इंच पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा अवकाळी पावसाने ओढ दिली व उन्हाची तीव्रता जास्त असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा तलावात दोन फुटाने पाणीसाठा कमी आहे. वरुणराजा वेळेत बरसला नाही तर सातारकरांची तहान भागविणे जिकिरीचे होणार आहे.
साताºयाला कास तलावातील तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यापैकी पहिला व्हॉल्व्ह चार महिन्यांपूर्वीच उघडा पडला होता. त्यानंतर दुसरा व्हॉल्व्हही उघडा पडला आहे. या दुसºया व्हॉल्व्हद्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सर्वात खाली अंतिम तिसºया व्हॉल्व्हद्वारे गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या तिसºया व्हॉल्व्हवरील संरक्षकजाळी पूर्णपणे उघडी पडली आहे.
शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे तलावातील पाणीपातळी दररोज सव्वा ते दीड इंचाने कमी होत आहे. पात्रातील जमिनीही उघडी पडल्याचे चित्र दिसत आहे. दिवसभर वातावरणात उष्णता अधिक तीव्रतेने भासत असून, दिवसेंदिवस पाणी पातळी खालावतच चालली आहे. तलावातील मुरून वाया जाणारे पाणी दिवस-रात्र दोन मोटारींच्या साह्याने उपसा करून पुन्हा पाटात सोडले जात आहे.

Web Title: Saturn water scarcity countdown begins!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.