साताऱ्याचा कंदी पेढा आता ‘शुगर फ्री’! देशभरातून, तसेच आखाती देशांतूनही मोठी मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 11:55 PM2018-11-07T23:55:31+5:302018-11-07T23:57:49+5:30
सचिन काकडे। सातारा : आगºयाचा पेठा, नाशिकची द्राक्षे अन् नागपूरची संत्री जशी प्रसिद्ध आहेत, तसाच साताºयाचा ‘कंदी पेढा’ही जगप्रसिद्ध ...
सचिन काकडे।
सातारा : आगºयाचा पेठा, नाशिकची द्राक्षे अन् नागपूरची संत्री जशी प्रसिद्ध आहेत, तसाच साताºयाचा ‘कंदी पेढा’ही जगप्रसिद्ध आहे. हा पेढा सातारा जिल्ह्याची ओळख असून, याचे नाव जरी काढले तरी जिभेवर गोडवा रेंगाळतो. येथील व्यावसायिकही आता पेढ्यांमध्ये नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. यावेळी खास मधुमेही रुग्णांसाठी ‘शुगर फ्री’ कंदी पेढे बाजारात आले आहेत. या पेढ्यांना भारतासह आखाती देशातून मागणी होऊ लागली आहे.
मधुमेह रूग्णांची संख्या जगभरात झपाट्याने वाढत आहेत. त्यांना गोड पदार्थ वर्ज असले तरी मनापासून खावेसे वाटतात. ही गोष्ट लक्षात घेऊन ‘शुगर फ्री’ कंदी पेढे बाजारात आले आहेत. पेढा हा प्रामुुख्याने खवा आणि साखरेपासून बनविला जातो. हे दोन पदार्थ पेढ्यातील महत्त्वाचे घटक. मात्र, ‘शुगर फ्री’ कंदी पेढ्यात या दोन्हींचाही वापर केला जात नाही. केवळ दुधाचा वापर करून हा पेढा तयार केला जातो. त्यामध्ये जो गोडवा निर्माण होतो, तो दुधापासून येतो. सजावटीसाठी यामध्ये केसरचा उपयोग केला जातो, अशी माहिती व्यावसायिकांनी दिली.
कंदी पेढ्याच्या तुलनेत याचे दर दुप्पट आहेत. शुगर फ्री साधा पेढा ९६० रुपये किलो तर केसरयुक्त पेढा १२०० रुपये किलो या दराने विकला जातो. सध्या दररोज सरासरी २५ किलो शुगर फ्री’ कंदी पेढ्यांची विक्री ही दुकान व आॅनलाईनच्या माध्यमातून होत आहे. महाराष्ट्रासह कोलकाता, हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, भोपाळ, दुबई या ठिकाणांहून याला मागणी आहे.
‘कंदी’चा रंजक इतिहास
‘कंदी’ पेढ्याला सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवव्या वंशजांनी पूर्वी महाराष्ट्रात व आता कर्नाटक असलेल्या चिकोडी जवळील खडकलाट येथील लाटकरांची काही कुटुंबं साताºयात स्थलांतरित केली. ही कुटुंबं मिठाई बनविण्याचे काम करीत. तेव्हापासून साताºयात पेढा बनविला जाऊ लागला. ‘कंदी’ हे पेढा बनविण्याच्या तंत्रज्ञानाचं नाव आहे. हा पेढा तयार करताना त्याला दोन वेळा भाजलं जातं. भाजल्यामुळे त्यातीत आर्द्रता निघून जाते. तो खमंग व मऊ राहतो. त्याच्या भाजणीच्या प्रक्रियेलाच कंदी असे म्हटले जाते.
असा होतो तयार...
पेढा हा प्रामुुख्याने खवा आणि साखरेपासून बनविला जातो. हे दोन पदार्थ पेढ्यातील महत्त्वाचे घटक. मात्र, ‘शुगर फ्री’ कंदी पेढ्यात या दोन्हींचाही वापर केला जात नाही. केवळ दुधाचा वापर करून हा पेढा तयार केला जातो. त्यामध्ये जो गोडवा निर्माण होतो, तो दुधापासून येतो. सजावटीसाठी यामध्ये केसरचा उपयोग केला जातो.