साताऱ्याचा लढा सुरूच राहणार!

By admin | Published: June 4, 2017 01:11 AM2017-06-04T01:11:37+5:302017-06-04T01:11:37+5:30

बळिराजा शेतकरी संघटना ठाम : उद्याच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये मुलाबाळांसह जनावरे घेऊन रस्त्यावर

Satyaar fight will continue! | साताऱ्याचा लढा सुरूच राहणार!

साताऱ्याचा लढा सुरूच राहणार!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : ‘मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना आश्वासनांचे गाजर दाखविले. शेतकऱ्यांच्या मागण्यांची सरकारकडून मोडतोड करण्यात आलेली आहे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयाला बळिराजा शेतकरी संघटना ठामपणे विरोध करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यातील शेतकरी ५ जून रोजी महाराष्ट्र बंद करणारच. वेळप्रसंगी शेतकरी मुलाबाळांसह जनावरांनाही सोबत घेऊन रस्त्यावर उतरतील,’ असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.
कऱ्हाड येथे शनिवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, साजीद मुल्ला, विश्वास जाधव आदिंसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंजाबराव पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मागण्या शंभर टक्के पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठराविक शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. संप मागे घेतला असल्याची खोटी अफवा सर्वत्र पसरली. त्यामुळे संपाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या संपात फुट पाडणाऱ्या सरकारचा बळीराजा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप पुढे सुरूच राहणार आहे.’
सचिन नलवडे म्हणाले, ‘गेल्या तीन ते चार वर्षांत राज्यात दुष्काळी परिस्थिती होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी किसान क्रांती मोर्चाची स्थापना करण्यात आली. त्याअनुषंगाने स्वाभीमानी शेतकरी संघटना व बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे गावोगावी बैठकाही घेण्यात आल्या. संप यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारीही करण्यात आली. त्यानुसार संप चांगल्या रितीने सुरू होता. मात्र, काही संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीत संघटनेत फुट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, आता कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी मागे हटू नये कारण शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी व बळीराजा शेतकरी संघटनेने सुरू केलेले हे आंदोलन आता संघटनेचे राहिले नसून ते शेतकऱ्यांचे झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या जोपर्यंत पुर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन पुढे सुरूच ठेवावे.’
भांडत बसण्यापेक्षा लढा !
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले आहे. मात्र, दुसरीकडे खासदार राजू शेट्टी व शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील हे एकमेकांवर टीका करीत बसले आहे.
सध्या एकमेकांशी भांडणे करीत बसण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. त्यांनी भांडत बसण्यापेक्षा संपाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे व बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सांगितले.
शनिवार संपाचा
सर्व भाजी मंडई ओस
फळभाज्यांचे दर कडाडले
दुधाची कोंडी
टोलनाक्यावर प्रचंड बंदोबस्त
संपाबाबत संभ्रमावस्था

Web Title: Satyaar fight will continue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.