‘लेक वाचवा’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:36 AM2021-03-28T04:36:07+5:302021-03-28T04:36:07+5:30
वर्षा देशपांडे यांनी २००४ मध्ये सहकाऱ्यांना सोबत घेऊन लेक लाडकी अभियान सुरू केले. याच अभियानाचा एक भाग म्हणून मुली ...
वर्षा देशपांडे यांनी २००४ मध्ये सहकाऱ्यांना सोबत घेऊन लेक लाडकी अभियान सुरू केले. याच अभियानाचा एक भाग म्हणून मुली वाचविण्याच्या हेतूने गर्भलिंग चिकित्सा करून लिंगनिदान व बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांचे स्टिंग ऑपरेशन सुरू झाले. देशातील पहिले स्टिंग ऑपरेशन २००४ मध्ये साताऱ्यात झाले आणि त्याचे श्रेय अर्थातच ॲड. वर्षा देशपांडे यांना जाते. परळी वैजनाथचं बहुचर्चित डॉ. मुंडे दाम्पत्याचे ‘स्टिंग’ वर्षाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच केले होते.
गेल्या १४ वर्षांत ॲड. देशपांडे यांनी केलेल्या सुमारे ५० स्टिंग ऑपरेशनमुळे ७० डॉक्टर आणि त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले. यापैकी १८ खटल्यांमध्ये गुन्हे शाबित होऊन संबंधितांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्या आहेत. राज्यात जन्माला येणाऱ्या मुलांमागे मुलींचे सर्वांत कमी प्रमाण बीड जिल्ह्यातील शिरुर-कासार या तालुक्यात नोंदवले गेले. पाणी समितीबरोबर बीड जिल्ह्यात वर्षाताईंनी १३५० गावांमध्ये मुलींची संख्या वाढली पाहिजे. ग्रामसभा सक्षम झाली पाहिजे. बालविवाह, गर्भलिंग निदान करणार नाही, या मुद्दयांवर जनजागृती सुरू केली.
चौकट ...
अनेकांचे योगदान
या चळवळीत अनेकांनी योगदान दिले. यामध्ये ॲड शैला जाधव या दलित महिला मंडळाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतात. वर्षा देशपांडे या मंडळाच्या संस्थापक-सचिव आहेत. माया पवार, सिंधुताई कांबळे, शकुंतला ठोंबरे, लता अवघडे, लालबी शेख या मंडळाच्या कार्यकारी सदस्या आहेत. त्यांना मंडळाच्या कामात स्वाती बल्लाळ, दीपेन्ती चिकणे, चैत्रा व्ही.एस., रूपाली मुळे, दिलीप भाटिया, जनार्दन घाडगे, राकेश नांगले, कैलास जाधव, बायडाबाई मदने, सीमा बळीप, सोना दळवी, सावित्रा बनसोडे यांचे सहकार्य असते.
- प्रगती जाधव-पाटील.