राष्ट्रीय मूलनिवासी’कडून आरक्षण बचाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:17+5:302021-07-16T04:27:17+5:30
सातारा : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने ‘आरक्षण बचाओ, लोकतंत्र बचाओ’ (प्रतिनिधित्व) आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन ...
सातारा : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने ‘आरक्षण बचाओ, लोकतंत्र बचाओ’ (प्रतिनिधित्व) आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन चार टप्प्यात होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
याबाबत जावळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसी या सामाजिक समूहांना पदोन्नतीत आरक्षण नाकारणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधात हे आंदोलन होत आहे. तसेच मागासवर्गीय आरक्षण, कामगार, कर्मचारी, शेतकरी, महिला आणि विद्यार्थी धोरणाच्या विरोधातही संघटनेच्या वतीने राज्यातील ३६ जिल्ह्यात आंदोलन होणार आहे.
राज्यात चार टप्प्यात आंदोलन होणार आहे. ७ आणि १२ जुलैला दोन टप्पे झाले. आता १९ जुलैला तालुकास्तरीय रॅली व शासकीय कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. तर २६ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.