सावंतवाडा शाळेची इमारत बनली धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:35 AM2021-07-26T04:35:06+5:302021-07-26T04:35:06+5:30
वाठार निंबाळकर : सावंतवाडा, ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत धोकादायक बनली आहे. सध्या शाळा बंद आहे. ...
वाठार निंबाळकर : सावंतवाडा, ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत धोकादायक बनली आहे. सध्या शाळा बंद आहे. या वेळात इमारत दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
सावंतवाडा येथील शाळेचे इमारत १९६२ मध्ये दगड व मातीमध्ये बांधण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या इमारतीची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली नसल्याने इमारतीच्या भिंती जीर्ण होऊन मोठ्या प्रमाणावर भेगा पडलेल्या आहेत. छतावरील कौले तुटली असून व त्याखालील लाकूड कुजलेले असल्याने कधीही पडून मोठी दुर्घटना घडण्याची भीती पालक व ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. सध्या शाळा बंद असल्याने या कालावधीत दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ विठ्ठल सावंत यांनी केली आहे.
याबाबतीत सरपंच प्रदीप सावंत म्हणाले, ‘पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकाऱ्यांना शाळा दुरुस्ती अथवा नवीन इमारत मिळण्याची वारंवार मागणी केली आहे. १९६० पासून अद्याप कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली नसल्याने दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तातडीने दुरुस्ती अथवा नवीन इमारत मिळायला हवी आहे.’