साठ बळी घेणाºया ‘एस’ला म्हणा ‘नो’--सातारा ‘खंबाटकी बोगदा परिसरातील वळण दुरुस्तची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 01:18 AM2017-11-19T01:18:32+5:302017-11-19T01:25:35+5:30
सातारा : ‘खंबाटकी बोगदा परिसरातील ‘एस’ वळणावर गेल्या दहा वर्षांत तब्बल ६० जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
सातारा : ‘खंबाटकी बोगदा परिसरातील ‘एस’ वळणावर गेल्या दहा वर्षांत तब्बल ६० जणांना
आपला प्राण गमवावा लागला आहे. तेव्हा या ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा एक किलोमीटर लांबून नवा रस्ता करावा,’ अशी मागणी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे निमंत्रित सदस्य मधुकर शेंबडे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
खंबाटकीचा नवीन बोगदा झाल्यानंतर त्या ठिकाणी ‘एस’ वळण तयार करण्यात आले आहे. या वळणावर आत्तापर्यंत अनेकांचा बळी गेलाय तर बºयाच जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. बोगदा ओलांडल्यानंतर वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे वाहने पलटी होत आहेत. गेल्या तीन वर्षांपूर्वी या वळणावर कंटेनर जीपवर कोसळून सहाजण ठार झाले होते. त्यानंतर अपघाताची मालिकाच सुरू झाली. या ‘एस’ वळण परिसरात सरासरी चार ते पाच प्राणघातक अपघात झाले आहेत. यामध्ये कोट्यवधींची हानी झाली आहे.
दिवसेंदिवस या वळणावर जड वाहनांचे अपघात होत असल्याने वाहतूक समादेशक मधुकर शेंबडे यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये त्यांनी ‘एस’ वळणावरील सध्याची स्थिती आणि दहा वर्षांत किती बळी गेले, याची सविस्तर आकडेवारी सादर केली आहे. महामार्ग प्राधिकरणने या ‘एस’ वळणावर तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. या संपूर्ण वळणावर क्रॅश बार लावले आहेत. मात्र, अपघातानंतर हे क्रॅश बार तग धरत नसून, सध्या हे बार तुटलेले आहेत. त्यामुळे हे ‘एस’ वळण कमी करून एक किलोमीटरचा रस्ता करण्यात यावा.
तातडीच्या उपाययोजना काय हव्यात..
तुटलेले क्रॅश बार भक्कमपणे नवीन उभारावेत.
क्रॅश बारना १०० टक्के लांबी व १ (सेमी रुंदीचे ३ एम प्रकारचे रिफ्लेक्टर लावावेत.
अपघात प्रवण क्षेत्रामध्ये ‘अॅक्सिडेंट प्रोन झोन’चे पाच बोर्ड लावावेत.
स्पीड लिमिट ५० असे किमान तीन बोर्ड लावावेत.
रंबलिंग व्हाईट स्टिप्स यांची लांबी सुमारे एक किलोमीटरपर्यंत असावी.
स्पीडगनचा वापर करून पोलिसांनी कारवाई करावी.
ओव्हरलोड वाहनांवर कारवाई व्हावी.