कºहाड परिवहन कार्यालयासमोर घोटाळतोय मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 02:06 PM2017-08-08T14:06:58+5:302017-08-08T14:11:00+5:30
कºहाड (जि. सातारा) : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. कºहाड-पाटण रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क केली जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या परिस्थितीकडे पोलिसांसह परिवहनच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष आहे.
कºहाड (जि. सातारा) : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. कºहाड-पाटण रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क केली जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या परिस्थितीकडे पोलिसांसह परिवहनच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष आहे.
कºहाड-पाटण मार्गावर वारूंजीफाटा येथून विजयनगरपर्यंत अनेक व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विमानतळ परिसरात सध्या हॉटेल, ढाबे, फर्निचर, विटभट्टी, बांधकाम साहित्य पुरवणारी दुकाने उभी करण्यात आली आहेत. गत काही वर्षांपुर्वी विजयनगर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय थाटण्यात आले. या कार्यालयाचे प्रवेशद्वार कºहाड-पाटण मार्गालगतच आहे. या कार्यालयात दररोज हजारो नागरीक कामानिमित्त येतात. मात्र, कार्यालयासमोर पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरीक आपली वाहने मुख्य रस्त्यावरच पार्क करतात.
वास्तविक, परिवहन कार्यालयामुळे परिसरातील अनेक तरूणांना रोजगारांची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे कार्यालयाच्या परिसरात रस्त्याकडेला हॉटेल, ढाबे, झेरॉक्स सेंटर, ड्रायव्हींग स्कूल, फोटो स्टुडिओ अशी दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे अगोदरच रस्त्याकडेला मोठी गर्दी असते. त्यातच दुकानात व परिवहन कार्यालयात येणाºया नागरीकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली नसल्याने वाहने मुख्य रस्त्यावर उभी केली जात आहेत. वाहने अस्ताव्यस्त उभी केल्याने वादावादीचे प्रसंग घडत असल्याचे दिसून येत आहे.
परिवहन कार्यालयच्या दोन्ही बाजूस रस्त्याला उतार व वळण आहे. त्यामुळे भरधाव येणारी वाहने परिवहन कार्यालयाच्या परिसरात येताच चालकाला रस्त्यावर गर्दी दिसते. त्यामुळे चालकाचा गोंधळ उडतो. वाहन नियंत्रित करताना त्याला कसरत करावी लागते. रस्त्याकडेला उभी केलेली वाहने व नागरीकांची वर्दळ यामुळे वाहतुकीला अरूंद रस्ता उपलब्ध असतो. अशा परिस्थितीत येथे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिवहन कार्यालयासमोर रस्त्यावर होणारे पार्किंग बंद करण्यात येऊन पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच रस्त्यावर वाहने पार्क करणाºयांवर कारवाई होणेही गरजेचे बनले आहे.
सुरक्षात्मक फलकही नाहीत
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात सुरक्षात्मक फलक असणे गरजेचे होते. संबंधित कार्यालय गुहाघर-पंढरपुर या राष्ट्रीय महामार्गालगत आहे. सुरूवातीला हा मार्ग राज्यमार्ग होता. मात्र, एप्रिल महिन्यात या मार्गाला महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. सुरक्षेच्यादृष्टीने या परिसरात फलक लावणे गरजेचे असताना येथे एकही फलक दृष्टीस पडत नाही.