दुष्काळी भागात चिंतेच्या ढगात शेतकऱ्यांचा वावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:08 PM2018-07-24T23:08:30+5:302018-07-24T23:08:43+5:30

The scarcity of concerns in the area of ​​the farmers! | दुष्काळी भागात चिंतेच्या ढगात शेतकऱ्यांचा वावर !

दुष्काळी भागात चिंतेच्या ढगात शेतकऱ्यांचा वावर !

Next

नितीन काळेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत असल्याने पेरण्यांना उरक आला आहे. तर पूर्व दुष्काळी भागात आजही अनेक शेतकरी पेरणीस धजावले नाहीत. त्यामुळे जुलै संपत आलातरी जिल्ह्यातील पेरणी १०० टक्के झालेली नाही. आतापर्यंत ८३.१९ टक्के पेरणी झाली आहे. माण, खटावमध्ये निश्चित केलेल्या क्षेत्राच्या जवळपास पेरणी आली आहे. पूर्वेकडे पाऊस नसल्याने शेतकºयांत चिंतेचे ढग आहेत. तर जिल्ह्यात सर्वात अधिक पेरणी ही सोयाबीनचीच झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाचे आगमन झाले असून, पूर्व भागात ऊन पडत असताना पश्चिम भागात मात्र जोरदार पाऊस कोसळत आहे. माण तालुक्यात आतापर्यंत ११० तर कोयनानगर येथे ३३०० मिलीमीटर पाऊस पडला आहे. पूर्व भागात पावसाच्या दडीमुळे चिंता लागली असून, पश्चिम भागात पेरणी, भात लावणीच्या कामाला वेग आला आहे.
पश्चिम भागात आनंदाचे वातावरण असून, भाताच्या लावणीला वेग आला आहे. भुईमूग, इतर कडधान्ये यांची पेरणी सुरू आहे. तर पूर्व भागात कशीबशी ८० टक्क्यांच्यावर पेरणी गेलेली आहे. जिल्ह्यात यावर्षी भाताचे सर्वसाधारण क्षेत्र ५०८०५ हेक्टर निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी २०९३० हेक्टरवर लागण झाली आहे. ही टक्केवारी ४१.२० टक्के इतकी आहे. ज्वारीचे क्षेत्र २६९४५ हेक्टर असून, २१४८१ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारीची ७९.७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरीचे पीक प्रामुख्याने कोरेगाव, माण, खटाव, फलटण आणि खंडाळा तालुक्यात घेण्यात येते. ४९५३१ हेक्टरपैकी ४४३७५ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली आहे. निश्चित केलेल्या क्षेत्रापैकी अद्यापही १० टक्के क्षेत्र बाजरीचे पेरणीविना पडून आहे. जिल्ह्यात मका क्षेत्राची ९७.९४ टक्के, नाचणी ४३.६० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तसेच इतर तृणधान्य, कडधान्यांची पेरणी सुरू असून, त्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर आहे.
पूर्व भागात अद्यापही म्हणावा तसा असा पाऊस झालेला नाही. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकºयांत मात्र चिंतेचे ढग दाटून आले आहेत. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर खरीप हंगामातील पेरणी केली. त्यानंतर पिकांची उगवणही चांगली झाली. त्यामुळे आता पिकांना पाण्याची आवश्यकता आहे.
सोयाबीन पेरणी १०० टक्क्यांवर; सूर्यफूल सर्वात कमी
सोयाबीन पिकाचे क्षेत्र ५३७५० हेक्टर निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी ५८७५० हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झालेली आहे. हे प्रमाण १०८.५६ टक्के इतके आहे. सातारा आणि वाई तालुक्यात सर्वसाधारणक्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. तर जिल्ह्यात सूर्यफुलाची लागण सर्वात कमी झालेली आहे. ५८१ हेक्टरपैकी ८२ हेक्टरवरच लागण झालेली आहे. याची टक्केवारी १४.११ टक्के इतकीच आहे. मुगाचीही १५६.९३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सर्वात अधिक आहे.

Web Title: The scarcity of concerns in the area of ​​the farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.