राज्य, राष्ट्रीय खेळाडूंना ‘पोदार’ स्कूलची शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2015 09:46 PM2015-05-22T21:46:00+5:302015-05-23T00:35:44+5:30
क्रीडा प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार
सातारा : येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी खेळाडूंना पोदार एज्युकेशन अँड स्पोर्टस ट्रस्टच्या वतीने शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. क्रीडा प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, पोदार स्कूलमधील अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत यश मिळविले आहे. त्यामधील शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे अशी : प्रतीक राऊत, श्रीकांत कोळेकर, नेहा सूळ, शिवराज भोसले, रोहित पवार, ईश्वरी शिंदे, सना यादव, वेदांत कोळेकर, हर्षल जाधव, कस्तुरी गोरे, केतकी गोरे, संस्कृती साहू, सेजल झंवर, नंदिता बोराटे, श्रृतिका कांबळे, संस्कार साहू, अथर्व निकम, ऋग्वेद राऊत, रुनाल भोसले, नम्रता जाधव, गुंजल जाखड, शेजल गोडसे, समरजित आहेरराव, तनिष्का कोरटील, प्रतीक खामकर, वसुंधरा भोसले, हिरल पटेल, प्रणव यादव, विराज देशमुख.
शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य एस. एन. साहू, उपप्राचार्य टी. एस. राजू, क्रीडाशिक्षक सुमेधा साबळे, प्रज्ञा शिंदे, अनुप हिंगमिरे, अमित वानखेडे, मनोज जाधव, विभाकर वाळिंबे उपस्थित होते. (प्रतिनिधी)