विद्यार्थ्यांना आपलेसे करण्यासाठी शाळांचे शर्तीचे प्रयत्न!, स्वागतासाठी सजावटींसह आकर्षक भेटवस्तू

By प्रगती पाटील | Published: June 15, 2023 01:47 PM2023-06-15T13:47:51+5:302023-06-15T13:48:12+5:30

सुट्टीच्या माहोलातून 'स्कूल चले हम' म्हणत विद्यार्थी शाळेत आले

School efforts to make students feel welcome, attractive gifts with welcome decorations | विद्यार्थ्यांना आपलेसे करण्यासाठी शाळांचे शर्तीचे प्रयत्न!, स्वागतासाठी सजावटींसह आकर्षक भेटवस्तू

विद्यार्थ्यांना आपलेसे करण्यासाठी शाळांचे शर्तीचे प्रयत्न!, स्वागतासाठी सजावटींसह आकर्षक भेटवस्तू

googlenewsNext

सातारा : सुट्टीच्या माहोलातून 'स्कूल चले हम' म्हणत विद्यार्थी शाळेत आले. पण तरीही पालकांना सोडून वर्गात बसण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांचे चेहरे रडवेले झाले होते. विद्यार्थ्यांना आपलेसे करण्यासाठी शाळांचे शर्तीचे प्रयत्न काही ठिकाणी अपुरे पडले. शाळेसह वर्गांना सजावट करून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन अनेक शाळांनी स्वागत समारंभ उत्साहात घेतला.

विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागली व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा प्रवेशोत्सव घेण्यात येतो. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी व दर्जेदार तसेच उत्सुकतेने होण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शैक्षणिक वर्षात पहिली ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाच्या प्रसंगी स्वागत करण्यात येणार आहे. 

शाळेचा उंबरठा पहिल्यांदाच ओलांडणाऱ्या मुलांना शाळा हवीहवीशी वाटावी यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. प्रभात फेरी, विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वितरण तसेच माध्यमं भोजनातील जीवनात गोड पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. स्थानिक कलाकार अथवा आजी-माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याकडेही शाळा व्यवस्थापनाचा कल आहे.

Web Title: School efforts to make students feel welcome, attractive gifts with welcome decorations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.