शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातील नगरपालिका शाळांत कराडच्या शाळा क्रमांक ३ ने रचला इतिहास
By प्रमोद सुकरे | Published: January 5, 2023 06:22 PM2023-01-05T18:22:48+5:302023-01-05T18:23:34+5:30
राज्यात कराड नगरपालिका शाळा क्रमांक ३ ही शासकीय शाळेत सर्वात जास्त पटसंख्या असणारी शाळा
कराड : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात कराड येथील नगरपालिका शाळा क्रमांक ३च्या २० विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. तर मंथन थोरात यांने राज्याच्या गुणवत्ता यादीत २रा तर अवनीश सूर्यवंशी यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत ५वा येण्याचा बहुमान मिळविला आहे.
सन २०११ पासून शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी येण्याची परंपरा जपली आहे. यावर्षी मात्र शाळेने २० विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणून राज्यातील नगरपालिकेच्या शाळांमध्ये एक नवा इतिहास घडवला आहे. यासाठी रामचंद्र मालुसरे, तुषार दबडे, सतीश मोरे या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांना मुख्याध्यापक अर्जुन कोळी ,उपमुख्याध्यापक जयश्री जाधव ,पर्यवेक्षक संग्राम गाढवे यांचे तितकेच मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
राज्यात कराड नगरपालिका शाळा क्रमांक ३ ही शासकीय शाळेत सर्वात जास्त पटसंख्या असणारी शाळा आहे. या शाळेत तीन तालुक्यातील ४८ गावचे विद्यार्थी शिक्षण घेतात. व्हिजन २०२५ साठी राज्यातील १ लाख८ हजार शाळांमधून शासनाने २ शाळांची निवड केली आहे. त्यामध्ये या शाळेचा समावेश केला आहे. तसेच दिल्ली येथील निपा संस्थेने शाळेची यशोगाथा देशातील सर्व राज्यांमध्ये प्रकाशित केली आहे.
गुणवत्ता यादीतील विद्यार्थी पुढीलप्रमाणे
मंथन महेंद्र थोरात, अवनिश अनिल सूर्यवंशी, स्वामिनी किरण देशमुख, माही महेश जाधव, देवेश प्रवीण कुंभार ,वरदराज विनायक कदम, अद्वैता दीपक भिसे,शाकिब अमजतखान मुजावर, अहद जहिरअब्बास शेख, मधुरा सचिन पाटील, सई संतोष रसाळ, आयुष नितीन जाधव, शारिया फिरोज पटेल, विराज राजाराम बजुगडे, अनुष्का जालिंदर देसाई, संचिता शंकर हुलवान, अक्षरा विवेक सूर्यवंशी, आर्यन संतोष पवार, हेमंत प्रवीण पाटील, अनय दादासो नांगरे