"तिने माझ्या मुलाला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं होss"; आईची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 02:50 PM2020-03-12T14:50:07+5:302020-03-12T14:53:50+5:30
एका पंधरा वर्षाच्या शाळकरी मुलाला जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून एका महिलेवर शहर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मुलाच्या आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सातारा : एका पंधरा वर्षाच्या शाळकरी मुलाला जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून एका महिलेवर शहर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मुलाच्या आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
संबंधित महिला सांगली जिल्ह्यातील मिरज येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी, साताऱ्यातील उपनगरामध्ये एक कुटुंब वास्तव करत आहे. त्या कुटुंबाच्या शेजारी मिरज येथील महिला राहात होती. काही महिन्यांपूर्वी संबंधित महिलेने शाळकरी मुलाला ब्लॅकमेल केले.
माझ्याशी तू गैरप्रकार केला आहेत, असे तुझ्या भावाला सांगेन, अशी त्या महिलेने मुलाला तंबी दिली. ह्यमी सांगेन तसे कर, असे म्हणून संबंधित अल्पवयीन मुलाला शरीरसंबंध ठेवण्यास त्या महिलेने भाग पाडले.
हा प्रकार समोर आल्यानंतर मुलाच्या घरातल्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित महिलेच्या विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिपर्यंत संबंधित महिलेला अटक झाली नव्हती.