ऑनलाइन गेमच्या खेळात पालकांच्या खिशाला कात्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:39 AM2021-05-09T04:39:51+5:302021-05-09T04:39:51+5:30

काही वर्षांपूर्वी घरातल्या टीव्हीला इडियट बॉक्स असं म्हटलं जायचं. दिवस- दिवस टीव्ही पाहण्यात मुले गुंतून पडायची. तर पालकदेखील रात्री ...

Scissors in parents' pockets in online gaming! | ऑनलाइन गेमच्या खेळात पालकांच्या खिशाला कात्री!

ऑनलाइन गेमच्या खेळात पालकांच्या खिशाला कात्री!

googlenewsNext

काही वर्षांपूर्वी घरातल्या टीव्हीला इडियट बॉक्स असं म्हटलं जायचं. दिवस- दिवस टीव्ही पाहण्यात मुले गुंतून पडायची. तर पालकदेखील रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहण्याचा शौक पूर्ण करायचे. आता मात्र प्रत्येकाच्या हातात छोटा टीव्ही मोबाइलच्या रुपात आलेला आहे. टीव्हीला इंटरनेट नव्हते मात्र मोबाइलला ते आहे 3g, 5g नेटवर्क देखील आता सहज उपलब्ध होत असून मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी तर प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाइल सक्तीने घ्यावाच लागलेला आहे.

मुले दिवस - दिवस मोबाइल वर गुंतून पडलेली दिसतात. मोबाइलमधील गेमचा मोह देखील मुलांना होतो. हा मोह अनेकदा पालकांना महागात पडतो आहे. यापैकी अनेक गेम्स अशा असतात की त्याला रेंट द्यावे लागते. अनेक गेम्सचे रेंट हे काही हजारांच्या घरात सुद्धा आहे. गेम खेळत असताना चुकून संबंधित कंपनीने ही गेम खरेदीसाठी रिक्वेस्ट पाठवली तर मुले रिक्वेस्ट नकळत स्वीकारतात.

मोबाइल नंबर, ई-मेल अकाउंट बँकेला जोडले गेले असल्याने संबंधित कंपनीला सहजरित्या बँकेमधून पैसे काढता येतात. त्यामुळे मुलांकडे मोबाइल असताना मोबाइलवर काही नवीन डाऊनलोड केले जाते, तेव्हा मुले मोबाइलवर आलेला ओटीपी पुढे पाठवत असतील तर धोका मोठा आहे. असा ओटीपी दिल्याने अनेकांचे खिसे मोकळे झालेले आहेत. लाखो रुपयांच्या रकमा खात्यातून रफा-दफा झालेल्या आहेत.

ही वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी प्रत्येक पालकाने सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे. इमेलचा पासवर्ड बदलणे, बँकेत जो मोबाइल नंबर दिला आहे त्याच्या जागी दुसरा मोबाइल नंबर देणे, फोन पे, गुगल पे यासारखे ॲप वापरले जातात तिथला पासवर्ड, मोबाइल नंबर बदलणे अशा क्लुप्ती आपण वापरू शकतो. या बाबी करण्याआधी मुलांवर देखील लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या मोबाइलला इंटरनेटची सुविधा आहे किंवा मोबाइल नंबर बँकेचे संलग्नित आहे, त्या मोबाईलवर मुलांना गेम खेळू न देणे हा सावधगिरीचा उत्तम पर्याय आहे.

सायबर तक्रार तरी कशी घेणार?

या प्रकरणांमध्ये सायबर सेलकडे तक्रार करायची म्हटली तरीदेखील संबंधित कंपनीने कोणताही गुन्हा केला नसल्याने गेमसाठी लागणारे रेंट तुम्ही भरता, त्यामुळे तक्रार देखील करता येत नाही.

- सागर गुजर

Web Title: Scissors in parents' pockets in online gaming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.